भारती विद्यापीठ पोलिसांनी केला पाठपुरावा
marathinews24.com
पुणे – गंभीर गुन्हे करणार्या कुख्यात गुंड सूरज ठोंबरे याच्यासह साथीदारांविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. अवैध मार्गाने पैसे मिळवणे, खूनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत, मारामारी, दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, वारंवार गंभीर गुन्हे केल्याप्रकरणी टोळीने गुन्हे केले आहेत. त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्यामुळे भारती विद्यापीठ पोलिसांनी टोळीविरुद्ध मोक्काचा प्रस्ताव पोलीस उपायुक्तांच्यावतीने अपर पोलीस आयुक्तांना पाठविला. त्यानुसार टोळी विरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे.
पुण्यात मांजरी बुद्रुक मध्ये कोयताधारी टोळक्याचा धुडगूस – सविस्तर बातमी
वेदांत रोहित सावंत (वय २१ रा. धनकवडी) अथर्व दत्तात्रय खोपडे (वय २१ रा. गुजरवाडी, कात्रज, मूळ-नाझरे, भोर) धीरज लखारा (रा. धनकवडी) सुरज अशोक ठोंबरे (वय २४, रा. नाना पेठ) मानव शरद ढमाले (वय २४, रा. धनकवडी) अशी मोक्कानुसार कारवाई केलेल्यांची नावे आहेत. टोळीने गुन्हा करताना काही नवीन साथीदारांना सोबत घेतले. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी पोलीस उपायुक्त मिलींद मोहिते यांना कारवाईचा प्रस्ताव पाठवला. अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्यावतीने हा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पाठवला. ही कारवाई एसीपी राहूल आवारे, वरिष्ठ निरीक्षक सुर्दशन गायकवाड, पोलीस निरीक्षक संतोष जाधव, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, विशाल वारुळे, श्रीकांत कुलकर्णी, स्वप्नील बांदल, सचिन सरपाले यांनी केली.
आंदेकर गँगवर हल्ल्यासाठी पोलीस व्हॅनचा केला पाठलाग
कुख्यात गुंड बंडू आंदेकर टोळीने आयुष कोमकर, गणेश काळे यांचा खून केला होता. तसेच अक्षय म्हस्के याच्यावर कोयत्याने वार केला होता. याचा बदला घेण्यासाठी गुंड सुरज ठोंबरे याने नियोजन केले. २६ जुलै २०२६ रोजी आंदेकर गँगमधील कृष्णा आंदेकर, स्वराज वाडकर, तुषार वाडकर यांना पोलीस व्हॅनमधून शिवाजीनगर न्यायालयात सुनावणीसाठी आणले जात होते. त्यावेळी आरोपी मानव ढमाले याच्या सांगण्यावरून पिस्तूल बाळगलेला वेदांत,अथर्व, धीरज यांनी शिवाजीनगर ते कुरोळी चाकणपर्यंत पोलीस व्हॅनची रेकी केली. त्याची माहिती सुरज ठोंबरे याला मोबाईलवर दिली. याप्रकरणी भारती विद्यापीठ ठाण्यात टोळीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तपासादरम्यान संबंधित टोळीच्या गुन्हेगारी कृत्यात सुधारणा झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव पाठवून अमलबजावणी केली.


























