Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

फॉर्म भरण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेला लुटले

पेट्रोल पंपात भागीदारीच्या आमिषाने २ कोटी २९ लाखांची फसवणूक

चार अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बँकेचा फॉर्म भरण्याची बतावणी करीत तीन ते चार महिलांनी जेष्ठ महिलेच्या हातातील पर्स हिसकावून नेली. ही घटना २१ ऑगस्टला दुपारी साडेबाराच्या सुमारास येरवड्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेसमोर घडली आहे. याप्रकरणी लोहगावात राहणार्‍या महिलेने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार चार अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इन्शुरन्सचा हप्ता भरण्याच्या नावाखाली लुटले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला लोहगावात राहायला असून, २१ ऑगस्टला दुपारी साडेबाराच्या सुमारास येरवड्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या बँकेसमोर उभ्या होत्या. त्यावेळी आलेल्या चौघा महिलांनी तक्रारदार महिलेला बँकेचा फॉर्म भरून देण्याच्या बतावणीने त्यांच्याकडील पर्स हिसकावून नेली. पर्समध्ये ३९ हजारांची रोकड असल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे तपास करीत आहेत.

नारायण पेठेत भरदिवसा घरफोडी

भरदिवसा बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने मिळून ६८ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना २७ ऑगस्टला सकाळी नउच्या सुमारास नारायण पेठेत घडली आहे. याप्रकरणी संबंधिताने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे नारायण पेठेत राहायला असून, २७ ऑगस्टला सकाळी नउ ते संध्याकाळी सहावाजेपर्यंत ते फ्लॅट बंद करुन बाहेर गेले होते. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून ११ हजार ५०० रुपयांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा मिळून ६८ हजारांचा ऐवज चोरुन नेला. बाहेरुन आल्यानंतर तक्रारदाराला घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक स्वरुपा नाईकवाडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×