Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुणे शहरातील ‘मिसिंग रोड’च्या कामांना गती देण्याचे महानगरपालिका आयुक्त

जिल्हाधिकारी यांचे निर्देश

marathinews24.com

पुणे – पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी विविध ठिकाणी आवश्यक असलेल्या ‘मिसिंग रोड’च्या कामांचा आढावा घेऊन प्रलंबित भूसंपादन व अन्य अडचणी तातडीने दूर करण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

कृषी व पशूसंवर्धन विभागाच्या, शेतकऱ्यांना थेट लाभाच्या DBT योजना त्वरित सुरू करा – सविस्तर बातमी

जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पुणे शहरातील मिसिंग रोडच्या अनुषंगाने बैठक झाली. पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) श्रीमती पवनीत कौर, अतिरिक्त आयुक्त ( विशेष ) श्री. ओमप्रकाश दिवटे, शहर मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत शहरातील विविध मिसिंग रोडची सद्यस्थिती, आवश्यक भूसंपादन, उपलब्ध जागा, संबंधित मालमत्ता, रस्ते जोडणीसाठी आवश्यक कार्यवाही तसेच प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यात आला.

शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि विविध भागांतील रस्ते जोडणी अधिक सक्षम करण्यासाठी मिसिंग रोडची कामे महत्त्वाची आहेत. त्यामुळे संबंधित रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक भूसंपादन व प्रशासकीय कार्यवाहीला गती देऊन प्रलंबित बाबींचा तातडीने निपटारा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले.

महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाच्या संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करून कामांच्या प्रगतीचा नियमित आढावा घ्यावा, असेही जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×