गुन्हे शाखा आणि पर्वती पोलिसांची धडक कारवाई
marathinews24.com
पुणे – पिंपरी-चिंचवडमधील सराइताला देशी बनावटीचे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल, ४ काडतुसे, मोबाइल, दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सुशील तानाजी गायकवाड (वय ३९, रा. दत्तनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गायकवाड याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झाला होता.
पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरात महिलेचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी
पुणे-सोलापूर रस्त्यावरील थेऊर फाटा परिसरात तो थांबला होता. त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट सहामधील सहायक पोलीस निरीक्षक संतोष कदम यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून एक पिस्तूल, चार काडतुसे जप्त करण्यात आली. पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष शेटे, सहायक निरीक्षक कदम, उपनिरीक्षक आशिष जाधव, ज्ञानेश्वर शिर्के, तानाजी देशमुख, श्रीकांत पांडुळे, बाळासाहेब सकटे, अमित कांबळे, अमित सस्ते यांनी ही कारवाई केली.
पर्वती परिसरात सराइताकडून पिस्तूल जप्त
पर्वती परिसरात देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल, एक काडतूस जप्त करण्यात आले. अनिकेत बापू कसबे (वय २५, रा. राजीव गांधीनगर, दांडेकर पूल, पर्वती) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पर्वती पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत होते. कसबे याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले.
त्याच्याकडून पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. सहायक आयुक्त गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, गु्नहे शाखेच्या निरीक्षक अनिता हिवरकर, सहायक निरीक्षक विशाल राऊत, उपनिरीक्षक प्रकाश खिलारी, प्रकाश मरगजे, अमोल दबडे, अमित चिव्हे, रणजीत घाडगे यांनी ही कारवाई केली.


























