Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

राज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

राज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

नेपाळमधील महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी विविध शासकीय यंत्रणा कार्यरत

marathinews24.com

मुंबई – नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेले पर्यटक यांच्या मदतीसाठी विविध पातळीवर शासकीय यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करत आहेत. सर्वजण सुरक्षितपणे त्यांच्या गावी परत पोहोचण्यासाठी सतर्कतेने योग्य नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

पुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी – सविस्तर बातमी

सागा येथून 41जण आज परतले असून 106 जण नागपूरला उद्या पहाटे 4.30 वाजता पोहोचतील. जवळपास 143 नागरिक राज्यात यशस्वी व सुरक्षितरित्या परतण्याच्या मार्गावर असून नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर्स जारी करण्यात आले आहेत. मंत्रालयातील नियंत्रण कक्षात 24 तास हा कक्ष कार्यरत असून महाराष्ट्रातील नागरिकांसाठी सहाय्यता व मदतकार्य समन्वय साधला जात आहे.

महाराष्ट्रातील 45 पर्यटकांचा भारतीय हद्दीत सुरक्षित प्रवेश

राज्यातील 45 जणांच्या पर्यटकांच्या ग्रुपने आज भारतीय हद्दीत प्रवेश केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून नाशिक , पुणे , मुंबई व अहिल्यानगर येथील नागरिक नेपाळ येथे गेले होते. महापुराच्या घटनेच्या कालावधीत हे नागरिक चितवन येथे होते. आज काठमांडूकडे जाणारे मार्ग बंद असल्याने नेपाळमधील लुंबिनी मार्गे त्यांना आणण्यात येत असून आज अयोध्या पोहोचल्यानंतर पुढील नियोजन शासनाच्या सूचनेनुसार केले जाणार आहे.

राज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन सूचनानुसार महाराष्ट्र शासन तसेच केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून आवश्यक मदत देण्यासाठी कार्यवाही केली जात आहे. आत्तापर्यंत प्राप्त माहितीनुसार राज्यातील 404 नागरिक सुरक्षित असून 338 नागरिकांशी संपर्क झाला आहे.

अजून 149 भारतीय पर्यटकांचा चीनमधून नेपाळमध्ये सुरक्षितरित्या प्रवेश

परराष्ट्र मंत्रालयाकडून काल 28 ऑगस्ट रोजी अखेरपर्यंत चीन मधून नेपाळमध्ये सुरक्षितरित्या प्रवेश केलेल्या 149 भारतीय पर्यटक नागरिकांची यादी राज्यांना पाठवण्यात आली आहे. यातील त्यांच्या जिल्ह्यांमध्ये सुरक्षितरित्या पोहोचविण्यासाठी कार्यवाही केली जात आहे. यातील महाराष्ट्रातील जिल्ह्यांतील संबंधित नागरिकांना असतील त्यांचे माहिती व नावे खात्री करून एकत्रित करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. हे पर्यटक लवकरच भारतात परतणार आहेत. यामध्ये मुंबई शहर किंवा मुंबई उपनगर जिल्ह्यांतील कोणत्याही नागरिकाबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला (BMC EOC) आतापर्यंत कोणताही कॉल आलेला नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारानंतर बसेस व प्रवासासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येऊन या पर्यटकांना भारतात आणले जात आहे. तर नागपूर येथील 106 जणांचा प्रवास आज बिहार मार्गे नागपूरच्या दिशेने सुरू झाला आहे.

बोरीवली आणि अंधेरी येथील 8 पर्यटक

बोरीवली आणि अंधेरी येथील 8 पर्यटकांची माहिती देण्यात आली असून. आपत्तीमुळे ते नेपाळमध्ये अडकले आहेत. यापैकी अंधेरी येथील लक्ष्मीनारायण आचार्य यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु त्यांचा अथवा ग्रुप मधील इतराचा मोबाईलद्वारे संपर्क होत नसल्याने सद्यस्थितीत अडचणी येत आहेत. त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मुंबईतील या पर्यटकांच्या नातेवाईकांच्या संपर्कात प्रशासन आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×