Breking News
पीएमपीचा बनावट पास तयार करुन फसवणूकहिंजवडी परिसरातील समस्या सोडविण्यासाठी हाय पॉवर कमिटीची पहिली बैठक संपन्नचाकण परिसरातील अतिक्रमण कार्यवाहीला सुरुवात; पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी करणार पाहणीउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांचा आढावाउपमुख्यमंत्र्यांकडून हिंजवडी परिसरातील नागरी व पायाभूत सुविधांच्या प्रश्नांचा आढावाबोपोडीतील रेडीरेकनरचा कमी असलेला दर वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार पुण्यात विद्यानंद बापट यांच्या मारहाणीचा निषेधदहीहंडी महोत्सवात पुणेकर अनुभवणार ‘दशावतार’पुण्यात गणशोत्सवात चार बेस, चार टॉपची मर्यादापुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण, पुणेकरांच्या संतप्त प्रतिक्रिया

पीएमपीचा बनावट पास तयार करुन फसवणूक

बेकायदा सावकारी प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे– पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपीएल) बनावट प्रवासी पास तयार करुन फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी प्रथमेश लक्ष्मण बोगे (वय २०, रा. रेड क्लिफ शाळेजवळ, चऱ्हाेली, आळंदी रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पीएमपीचे सहायक आगार व्यवस्थापक रामदास विरनक यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात विद्यानंद बापट यांच्या मारहाणीचा निषेध – सविस्तर बातमी

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने पीएमपी प्रवासाचा बनावट पास, तसेच ॲप तयार केले होते. या पासचा वापर करुन तो प्रवास करत होता. ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास तो पीएमपी बसने प्रवास करत होता. बंडगार्डन रस्त्यावरील रूबी हाॅल थांब्याजवळ ताे बसमधून उतरला. तिकिट तपासनीसांनी त्याच्याकडे तिकिटाची मागणी केली. तेव्हा त्याने तिकिट तपासनीसांना प्रवासी पास दाखविला. पास, तसेच त्याच्याकडील ॲपची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्याने बनावट पास आणि ॲप तयार केल्याचे उघडकीस आले. आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीने बनावट पास कसा तयार केला ?, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक पोटे तपास करत आहेत.

पीएमपी प्रवासी महिलेच्या पिशवीतून दागिने चोरी

पुणे-पीएमपी प्रवासी महिलेच्या पिशवीतून ९५ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार ४४ महिला मुळशी तालुक्यातील घोटावडे फाटा परिसरात राहायला आहेत. त्या ३ सप्टेंबर रोजी घोटावडे फाटा ते कोथरूड या मार्गावरील बसमधून प्रवास करत होत्या. बस प्रवासात चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतून ९५ हजार रुपयांचे मंगळसूत्र आणि रोकड चोरुन नेली. पौड रस्त्यावरील लोहिया जैना आयटी पार्कजवळील थांब्यावर त्या उतरल्या. तेव्हा पिशवीतून दागिने, रोकड चोरल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक घावटे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×