Breking News
गॅस पुरवठा खंडीत करण्याची बतावणी करुन १० लाखांची फसवणूकमहापारेषणच्या चिंचवड अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात आगभरती परीक्षा पद्धतीच्या सर्वंकष अभ्यासासाठी पुण्यात १२ सप्टेंबरला सल्लामसलतपुण्यात पार्किंगमध्ये गाडी लावताना तरुणावर गोळीबार, तिघांना अटकदातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी; एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन – चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादनकसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडीपुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरारश्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष! हर्षवर्धन फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात कलाकारांची मांदियाळीशेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यावा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारराज्यस्तरीय भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती

महापारेषणच्या चिंचवड अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात आग

महापारेषणच्या चिंचवड अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात आग

महापारेषणच्या यंत्रणेतील बिघाडाचा महावितरणच्या वीजपुरवठ्यावर परिणाम; बहुतांश भागाचा वीजपुरवठा पूर्ववत

marathinews24.com

पुणे – महापारेषण कंपनीच्या चिंचवड येथील २२० केव्ही अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात रविवारी (दि. ६) दुपारी सुमारे १२.२५ वाजता तांत्रिक बिघाड होऊन आग लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून, या बिघाडाचा परिणाम महावितरणच्या वीजपुरवठ्यावर झाला. महावितरणने उपलब्ध पर्यायी मार्गांचा वापर करून बहुतांश प्रभावित भागाचा वीजपुरवठा दुपारी ३ वाजेपर्यंत पूर्ववत करण्यात यश मिळविले.

भरती परीक्षा पद्धतीच्या सर्वंकष अभ्यासासाठी पुण्यात १२ सप्टेंबरला सल्लामसलत – सविस्तर बातमी 

चिंचवड उपकेंद्रातील २२ केव्ही सीटी व ब्रेकरमध्ये स्फोट होऊन आग लागल्याने महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या उच्चदाब वाहिन्यांवर परिणाम झाला. परिणामी पिंपरी-चिंचवड शहरातील प्राधिकरण, रावेत, काळेवाडी, वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, सांगवी, पुनावळे, ताथवडे आदी भागांतील वीजपुरवठ्यावर परिणाम झाला. तसेच शिवाजीनगर, औंध व गणेशखिंड भागातील वीजपुरवठाही काही काळ खंडित झाला.

महापारेषणकडून बिघाड झालेला भाग बंद ठेवून उर्वरित यंत्रणा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तर दुसरीकडे, महावितरणकडून उपलब्ध पर्यायी मार्गांचा वापर करून प्रभावित भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे बहुतांश भागातील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात यश मिळाले.

शिवाजीनगर परिसरातील वीजपुरवठाही काही काळ खंडित

चिंचवड अतिउच्चदाब वीज उपकेंद्रातून निघणाऱ्या रहाटणी व गणेशखिंड १३२ केव्ही वाहिनीवर परिणाम झाल्याने शिवाजीनगर, औंध, गणेशखिंड, सेनापती बापट रोड, शिवाजीनगर गावठाण, मॉडेल कॉलनी, बालगंधर्व आदी भागांतील वीजपुरवठाही काही काळ खंडित झाला होता. दुपारी १२.२५ वाजता खंडित झालेला या भागातील वीजपुरवठा सुमारे १.५० वाजता पूर्ववत करण्यात आला. गणेशखिंड अतिउच्चदाब वीज उपकेंद्रातून पुणे मेट्रोलाही वीजपुरवठा होतो. या वीजपुरवठ्यावरही काही काळ परिणाम झाला होता.

बाधित ग्राहकसंख्या
महापारेषणच्या चिंचवड अतिउच्चदाब वीज उपकेंद्रातील बिघाडामुळे महावितरणच्या वीजपुरवठ्यावर परिणाम होऊन पिंपरी-चिंचवड, भोसरी परिसरातील सुमारे २ लाख ६० हजार ग्राहक, तर शिवाजीनगर, औंध, गणेशखिंड, सेनापती बापट रस्ता, मॉडेल कॉलनी, बालगंधर्व आदी परिसरातील सुमारे ५० हजार ग्राहक, अशा एकूण सुमारे ३ लाख १० हजार ग्राहकांच्या वीजपुरवठ्यावर परिणाम झाला.

*निगडी परिसरातील सुमारे सव्वालाख ग्राहकांना विलंब*

महावितरणने पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरळीत करण्यावर भर देऊन बहुतांश भागातील वीजपुरवठा दुपारी ३ वाजेपर्यंत पूर्ववत केला. मात्र निगडी, यमुनानगर, बिजलीनगर, रावेत, मामुर्डी, देहूरोड, चिंचवड, ताथवडे, वाकड आदी परिसरातील वीजपुरवठा सुरळीत होण्यास काहीसा विलंब होत आहे. या भागातील सुमारे सव्वालाख ग्राहकांना वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी अधिक वेळ लागत आहे.

आंबेठाण व तळेगावलाही फटका

चिंचवड अतिउच्चदाब उपकेंद्रातील बिघाडाचा फटका आंबेठाण (चाकण) व तळेगाव १३२ उपकेंद्रांनाही बसला. महावितरणने तळेगाव शहराचा वीजपुरवठा खोपोलीतून पर्यायी लाईनद्वारे पूर्ववत करुन घरगुती ग्राहकांना दिलासा दिला. मात्र औद्योगिक वीजपुरवठा पूर्ववत करण्याचा तांत्रिक मर्यादा आल्या. तर आंबेठाण उपकेंद्राचा १२.२५ वाजता बंद झालेला वीजपुरवठा दुपारी ४.२० वाजता सुरळीत झाला. अंदाजे दीड हजार उद्योगांना याची झळ बसली.

महावितरणकडून प्रभावी नियोजन
महापारेषणच्या अतिउच्चदाब यंत्रणेतील बिघाडामुळे महावितरणच्या वितरण व्यवस्थेवर परिणाम झाला असला, तरी महावितरणने उपलब्ध पर्यायी व्यवस्थेचा प्रभावी वापर करून बहुतांश भागातील वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. उर्वरित प्रभावित भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×