Breking News
ससून रुग्णालयाजवळ तरुणाला चाकूच्या धाकाने लुटलेआवाज बंद कर डीजे, तुला पुणेकरांची शपथ हाय’हातउसने पैसे परत करण्याची बतावणी; युवतीवर अत्याचाराचा प्रयत्नगॅस पुरवठा खंडीत करण्याची बतावणी करुन १० लाखांची फसवणूकमहापारेषणच्या चिंचवड अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात आगभरती परीक्षा पद्धतीच्या सर्वंकष अभ्यासासाठी पुण्यात १२ सप्टेंबरला सल्लामसलतपुण्यात पार्किंगमध्ये गाडी लावताना तरुणावर गोळीबार, तिघांना अटकदातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी; एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन – चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादनकसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडीपुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरार

ससून रुग्णालयाजवळ तरुणाला चाकूच्या धाकाने लुटले

ससून रुग्णालयाजवळ तरुणाला चाकूच्या धाकाने लुटले

चोरट्यांविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – ससून रूग्णालयाजवळ महाविद्यालयीन तरुणाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाइल संच हिसकावून नेण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महाविद्यालयीन तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

आवाज बंद कर डीजे, तुला पुणेकरांची शपथ हाय’ – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २० वर्षीय तरुण मूळचा जळगावमधील वडली गावचा रहिवासी आहे. तो विमाननगर भागात राहायला असून, तो पुण्यात शिक्षणासाठी आला आहे. ५ सप्टेंबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास तो मालधक्का परिसरातून पुणे स्टेशनकडे निघाला होता. ससून रुग्णालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या प्रवेशाद्वाराजवळ चोरट्यांनी त्याला अडवले. त्याला चाकूचा धाक दाखविला. जिवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. तरुणाकडील दहा हजार रुपयांचा मोबाइल संच हिसकावून चोरटे पसार झाले. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक मदने तपास करत आहेत.

वानवडीत तरुणाचा खुनाचा प्रयत्न

श्वानाला घेऊन पहाटे फेरफटका मारण्यासाठी निघालेल्या तरुणावर शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना वानवडी परिसरात घडली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.

राहुल बाळकृष्ण गव्हाणे (वय ३६, रा. मारुती एनक्लेव्ह, वानवडी गाव) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी मोहसीन खुदबुद्दीन शेख (वय २५), अनिकेत संजय वाघमारे (वय २०, दोघे रा. बालाजीनगर, धनकवडी) यांना अटक करण्यात आली. याबाबत राहुल यांचा भाऊ निखिल (वय ३८) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिासंनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गव्हाणे हे रविवारी (६ सप्टेंबर) पहाटे पाचच्या सुमारास श्वानाला घेऊन फेरफटका मारण्यासाठी निघाले होते. गव्हाणे राहत असलेल्या सोसायटीच्या परिसरात आरोपी शेख, वाघमारे हे थांबले होते. अंधारात दोघे जण थांबल्याने गव्हाणे यांना संशय आला. त्यांनी दोघांना हटकले. तेव्हा आरोपींनी गव्हाणे यांच्यावर हल्ला केला. तीक्ष्ण शस्त्राने त्यांच्यावर चाकूने वार केले, तसेच काचेची बाटली फोडून मानेवर वार केला.

आरोपींनी केलेल्या हल्ल्यात गव्हाणे गंभीर जखमी झाले. गव्हाणे यांनी आरडाओरडा केल्यानंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना नागरिकांनी पकडले. दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक जानराव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×