Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

पुण्यात भरधाव मोटारीच्या धडकेत संगणक अभियंत्याचा मृत्यू

पुण्यात भरधाव मोटारीच्या धडकेत संगणक अभियंत्याचा मृत्यू

 पाषाण रस्त्यावर घडला अपघात

marathinews24.com

पुणे – भरधाव मोटारीच्या धडकेत सकाळी फिरायला निघालेल्या संगणक अभियंता तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी पाषाण परिसरात घडली. या प्रकरणी मोटार चालक तरुणाविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वीरेंद्र राघवेंद्रप्रसाद द्विवेदी (वय ४८, रा. गुलमोहोर प्लाझा, विवेकानंद सोसायटी, पाषाण) असे मृत्युमुखी पडलेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत वीरेंद्र यांचे बंधू धीरेंद्र (वय ४३) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सहकारनगर भागात वाहनांची तोडफोड; आरोपी अटकेत – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरेंद्र द्विवेदी हे दररोज सकाळी फिरायला जायचे. शनिवारी (१२ सप्टेंबर) सकाळी ते नेहमीप्रमाणे पाषाण परिसरातील नेकलेस गार्डन येथे फिरायला गेले होते. लष्कराच्या संशोधन आणि विकास संस्थेजवळ (डीआरडीई) भरधाव मोटारीने द्विवेदी यांना धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर मोटार चालकाने नागरिकांच्या मदतीने द्विवेदी यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. द्विवेदी मूळचे मध्य प्रदेशातील रेवा येथील आहेत. द्विवेदी कुटुंबीय हे पाषाण येथील गुलमोहोर प्लाझा सोसायटीत राहत होते. ते हिंजवडीतील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×