Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

सहकारनगर भागात वाहनांची तोडफोड; आरोपी अटकेत

सहकारनगर भागात वाहनांची तोडफोड; आरोपी अटकेत

गुन्हे शाखेकडून २० वर्षीय आरोपी अटकेत, दोन अल्पवयीन साथीदार ताब्यात

marathinews24.com

पुणे – सहकारनगर भागात वाहनांची तोडफोड करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. सोहम हरीष चौहान (वय २०, रा. झांबरे हाईट्स, चव्हाणनगर, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. चौहान याच्या अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. शनिवारी मध्यरात्री सहकारनगर भागात वाहनांची तोडफोड करण्याची घटना घडली होती.

जुन्या भांडणातून तरुणावर गोळीबार; ५ जणांना बेड्या – सविस्तर बातमी 

वाहन तोडफोड करून आराेपी पसार झाले होते. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून समांतर तपास करण्यात येत होता. सोहम चौहान याने दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीन वाहनांची तोडफोड करून दहशत माजविल्याची माहिती तपासात पोलीस हवालदार शंकर कुंभार यांना मिळाली. आरोपी तळजाई वसाहत परिसरात थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा लावून चौहान आणि त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, अविनाश माने, सहायक निरीक्षक स्वप्नील लोहार, तेजश्री पवार, शंकर कुंभार, कुंदन शिंदे, शंकर नेवसे, योगेश मांढरे, उज्ज्वल मोकाशी, संतोष टकले, साधना ताम्हाणे यांनी ही कारवाई केली.

वैमनस्यातून तरुणावर गोळीबार; पाच जण गजाआड

वैमनस्यातून तरुणावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गाेळीबार करुन पसार झालेल्या पाच जणांना आंबेगाव पोलिसांनी गजाआड केली. त्यांच्याकडून तीन पिस्तुले, तसेच चार काडतुसे जप्त करण्यात आली. शिवदत्त उर्फ सोन्या हरीकाका कोंढरे (वय २३), श्रेयस रूपेश काटे (वय २३), सूरज सुभाष डिंबळे (वय २३), आतिष उमेश मोरे (वय २८), ऋत्विक उर्फ दगडू पाडुरंग बेलदरे (वय २४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

दहीहंडीच्या दिवशी (५ सप्टेंबर) मध्यरात्री आंबेगाव बुद्रुकमधील भेंडी चौकात असलेल्या सोसायटीच्या आवारात तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला होता. वैमनस्यातून तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती तपासात मिळाल्यानंतर पोलिसांनी पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासात गोळीबार प्रकरणातील आरोपी आंबेगावमधील जांभुळवाडी रस्त्यावर थांबल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा लावून पाच जणांना पकडले. त्यांच्याकडून पिस्तुले, काडतुसे जप्त केली. आरोपींना १४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, गुन्हे शाखेचे निरीक्षक चांगदेव सजगणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक युवराज शिंदे, पोलीस कर्मचारी चेतन गोरे, हनुमंत मासाळ, हरीष गायकवाड, नीलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, योगेश जगदाळे यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×