Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

जुन्या भांडणातून तरुणावर गोळीबार; ५ जणांना बेड्या

Ambegaon Firing Case Pune, Pune Crime News, Ambegaon Crime, Ambegaon Budruk Firing, Pune Firing Case, Firing on Youth Pune, Old Dispute Firing, Shooting Case Pune, Attempt to Murder Pune, Ambegaon Police Station, Pune Police, Country Made Pistols Pune, Desi Pistol Seized Pune, Three Pistols Seized, Live Cartridges Seized, Four Live Cartridges, Illegal Firearms Pune, Firearms Crime Pune, Five Accused Arrested, Pune Gang Crime, Haranai Complex Ambegaon, Bhendi Chowk Pune, Jambhulwadi Crime, Pune Crime Branch, Police Action Pune, Technical Analysis Pune Police, Criminal Arrest Pune, Weapon Seizure Pune, Maharashtra Crime News, Pune Latest Crime News, Pune Police News, Pune Latest News, Law and Order Pune

आंबेगाव पोलिसांची कारवाई; तीन गावठी पिस्तुले, चार जिवंत काडतुसे जप्त

marathinews24.com

पुणे – जुन्या भांडणाच्या वादातून तरुणाला शिवीगाळ करीत त्याच्यावर गावठी पिस्तुलातून दोन गोळ्या झाडून पसार झालेल्या ५ जणांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून तीन गावठी पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. शिवदत्त उर्फ सोन्या हरीकाका कोंढरे (वय २३), श्रेयश रुपेश काटे (वय २३), सुरज सुभाष डिंबळे (वय २३), अतिष उमेश मोरे (वय २८) आणि ऋत्विक उर्फ दगडू पाडुरंग बेलदरे (वय २४) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

ब्युटीपार्लर, स्वयंसेवी संस्थेच्या कार्यालयात चोरी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव बुद्रुकमधील भेंडी चौक येथील हरनाई कॉम्प्लेक्समध्ये ५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास गोळीबार झाला होता. या प्रकरणातील फिर्यादींचा मुलगा इमारतीच्या पार्किंगमध्ये वाहन उभे करून जिन्याने घरी जात होता. त्यावेळी आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून त्याला शिवीगाळ केली. जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या दिशेने गावठी पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर आरोपी पिस्तुलासह पसार झाले. याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलिस अधिनियम आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्टमधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. तपास पथकाने गोपनीय माहिती आणि आरोपींच्या मोबाइल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण केले.

आरोपी जांभूळवाडी परिसरातील दक्षिण हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. झडतीमध्ये त्यांच्याकडे तीन गावठी पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे सापडली. न्यायालयाने आरोपींना १४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चांगदेव सजगणे, उपनिरीक्षक युवराज शिंदे, आंबेगाव पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक युवराज शिंदे करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×