मोबाइल, रोकड व चांदीच्या नाण्यासह ३० हजारांचा ऐवज लंपास
marathinews24.com
पुणे – शहरातील नवी पेठेत चोरट्यांनी उच्छाद मांडला असून ब्युटीपार्लरमधून चोरट्यांनी ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला, तसेच एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. नवी पेठेतील दादा हर्डीकर पथ परिसरातील एका बंगल्याच्या आवारात ब्युटीपार्लर आहे. चोरट्यांनी शुक्रवारी (११ सप्टेंबर) मध्यरात्री ब्युटीपार्लरचे कुलूप तोडले. ब्युटीपार्लरमध्ये ठेवलेला मोबाइल, चांदीचे नाणे, रोकड असा ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला.
शासकीय नोकरीच्या आमिषाने पाच लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
दादा हर्डीकर पथ परिसरातील आणखी एका बंगल्यात सेवावर्धिनी संस्थेचे कार्यालय आहे. चोरट्यांनी स्वयंसेवी संस्थेच्या कार्यालयाचे कुलूप तोडले. कार्यालयातील साहित्या अस्ताव्यस्त केले. चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याची फिर्याद देण्यात आली आहे. याबाबत संस्थेच्या पदाधिकाऱ्याने फिर्याद दिली आहे. हवालदार भांगे तपास करत आहेत.
विश्रांतवाडीत घरफोडी
विश्रांतवाडी भागातील एका सोसायटीत असलेल्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील रोकड आणि दागिने असा पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज चाेरुन नेला. याबाबत एकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि कुटुंबीय हे टिंगरेनगर भागातील पूजा अपार्टमेंटमध्ये राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. कपाटातील सात हजारांची रोकड, दागिने असा दाेन लाख ७३ हजार रुपयांचा ऐवज चोरून चोरटे पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक उगले तपास करत आहेत.





















