दोघांविरुद्ध पर्वती पोलिसांत गुन्हा
marathinews24.com
पुणे – शासकीय नोकरीच्या आमिषाने तरुणीची पाच लाख १७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ महिलेची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी सिंहगड रस्ता परिसरात राहायला आहे. आरोपींशी तिची वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दोघा आरोपींनी तिला दाखविले होते. आरोपींनी तिच्याकडून वेळोवेळी पाच लाख १७ हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर तक्रादार तरुणीने आरोपींकडे नोकरीबाबत विचारणा केली. तेव्हा आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक महाले तपास करत आहेत.





















