Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

विवाहाच्या आमिषाने तरुणीची २८ लाखांची फसवणूक

विवाहाच्या आमिषाने तरुणीची २८ लाखांची फसवणूक

विवाहविषयक संकेतस्थळावर ओळख वाढवून तरुणीला जाळ्यात ओढले

marathinews24.com

पुणे – विवाहविषयक संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून एका तरुणीची २८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी फसवणूक, तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हुंड्यासाठी महिलेचा छळ करुन अघोरी कृत्य – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी उच्चशिक्षित आहे. तिने विवाहविषयक संकेतस्थळावर नोंदणी केली होती. आरोपीने तरुणीशी संपर्क साधला. विवाहासाठी उत्सुक असल्याचे त्याने तरुणीला सांगितले, तसेच तुर्कीतील एका कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी त्याने केली. त्यानंतर आरोपीने तरुणीशी नियमित संपर्क साधण्यास सुरुवात केली. विवाहाच्या आमिषाने तरुणीला जाळ्यात ओढले. तुर्कीतील बँक खाते काही कारणास्तव गोठविण्यात आले आहे. तातडीने पैशांची आवश्यकता आहे, असे सांगून आरोपीने तरुणीला पैसे पाठविण्यास सांगितले. तरुणीने आरोपीच्या बँक खात्यात गेल्या पाच ते सहा महिन्यात वेळोवेळी २७ लाख ९४ हजार रुपये पाठविले. पैसे पाठविल्यानंतर आरोपीने त्याचा मोबाइल क्रमांक बंद केला. तरुणीने त्याच्याशी संपर्क साधला. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक रेवले तपास करत आहेत.

गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका ज्येष्ठ नागरिकाची १८ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे कोथरूड भागात राहायला आहेत. तक्रारदार हे सेवानिवृत्त आहेत. जून महिन्यात त्यांनी समाज माध्यमात शेअर बाजारातील गुंतवणूक विषयक जाहीरात पाहिली होती. जाहिरातीत शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले होते.

तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाने सायबर चोरट्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून सायबर चोरट्याने तक्रारदाराला पैसे गुंतविण्यास सांगितले. तक्रारदाराने १८ लाख ६० हजार रुपये गुंतविले. गुंतवणूक केल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही, तसेच गुंतवणूक केलेली रक्कमही परत करण्यात आली नाही. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×