Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

उल्हास, वैतरणा खोऱ्यातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध

उल्हास, वैतरणा खोऱ्यातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध

ठाणे- रायगड – पुणे – नगर – नाशिक – पालघर जिह्याव्यापी प्रकल्प विरोधी समन्वय समितीचे गठण

marathinews24.com

पुणे – ठाणे सरकार आणि राजकारणी यांच्या अविचारी संकल्पनेतून प्रस्तावित असलेल्या उल्हास -गोदावरी – वैतरणा नदी जोड प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी गत आठवड्यात शहापूर तालुक्यातील आंबेखोर गावाच्या हद्दीत भूगर्भ अन्वेषण सुरू करण्यात आले होते.त्यावेळी शाई संघर्ष समितीचे पदाधिकारी व स्थानिक शेतकरी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हे काम बंद पाडले होते, त्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील विविध भागात प्रस्तावित असलेल्या अन्यायकारक प्रकल्पातील शेतकरी बांधवांची प्रातिनिधिक बैठक शहापूर तालुक्यातील पाचघर येथे आयोजित करण्यात आली होती.

कोकणला टोलमाफी, मराठवाड्याला का नाही? गौरी-गणपतीसाठी गावी जाणाऱ्या मराठवाडावासीयांना विशेष टोलसवलतीची मागणी – सविस्तर बातमी 

काळू धरण, शाई धरण, माळशेज- भोरांडे अदानी प्रकल्प, भावली प्रकल्प, सरळगाव एमआयडीसी, पोशिर धरण, कल्याण – लातूर जनकल्याण महामार्ग आणि वैतरणा खोऱ्यातील बाधित शेतकरी प्रतिनिधी यांनी उपस्थिती दाखवित या अन्यायकारक प्रकल्पांना एकजुटीची वज्रमूठ बांधत तीव्र विरोध करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.

महाराष्ट्र जनआंदोलन मंचचे प्रवर्तक प्रशांत सरखोत म्हणाले की ” शाई व काळू धरणाचे काम अद्यापपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या एकजुटीने रोखून धरले आहे. परंतु उल्हास व वैतरणा खोऱ्यातील अतिरिक्‍त पाणी उपसा पद्धतीने गोदावरी खोऱ्यात वळविण्याची, अत्यंत विनाशकारी नदीजोड योजना अंमलात आणण्यासाठी कल्याण, भिवंडी, शहापूर, मुरबाड , कर्जत या तालुक्यातील सुमारे ८४ गावात भूगर्भ अन्वेषण सुरु झाले आहे त्याला ठाम विरोध करून प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी करण्याचे आवाहन उपस्थिना केले. तर काळू नदी धरणग्रस्त सामाजिक संस्था यांचे सल्लागार संभाजी गोडांबे म्हणाले,”शिरोशी- माळ पठार , टाकीपठार, आंबेखोर पठार, साकडबाव पठार, दापूरमाळ पठार या पठारांवरून पाईपलाईन नेण्याचे प्रयोजन आहे. तरी याला सर्व आदिवासी बांधवांना विश्वासात घेऊन तीव्र विरोध करण्याची गरज आहे . तर भविष्यात या पठारांवर चोंढा प्रकल्पासारखा विध्वंसक उदंचन विद्युत प्रकल्प उभारण्याची शक्यता तपासण्यात येणार आहे त्यासाठी वेळीच सावध होऊन आपण हे काम एक इंचहि पुढे होऊ देणार नसून संबधित अधिकारी यांना तशा आशयाचे निवेदन देण्यात येणार असल्याचे शाई धरण संघर्ष समितीचे कार्यवाह उमेश वारघडे यांनी सांगितले.

पश्चिम वाहिनी उल्हास व वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवताना स्थानिक भूमिपुत्रांच्या हिताचा शासनाला विसर पडला असून यातून नक्कीच कोणततरी षडयंत्र सुरू असून हा डाव हाणून पडण्याचा निर्धार करण्याचे आवाहन शेतकरी नेते पोपटराव देशमुख यांनी केले. तर या विषयांवर विशेष ग्रामसभा बोलावून तसे प्रकल्पविरोधी ठराव पारीत करण्याचे आवाहन आदिवासी प्रतिनिधी किसन वाख यांनी केले. त्याकरिता सह्याद्रीच्या पश्चिम व पूर्व पायथ्याशी वसलेल्या गावामध्ये प्रस्तावित प्रकल्पां संबंधी जनजागृती व शेतकरी संघटन करण्यासाठी ठाणे- रायगड – पुणे – नगर – नाशिक – पालघर या जिल्ह्यातील प्रास्तवित प्रकल्प विरोधी समन्वय समितीचे गठण करून विविध सामाजिक संस्था व स्थानिक संघर्ष समिती यांच्या माध्यमातून एकजुटीने विरोध तीव्र करण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला. याप्रसंगी विविध प्रकल्पातील शेतकरी प्रतिनिधी यांच्या सोबत संबंधित ग्रामपंचायतींचे पदाधिकारी आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×