Breking News
Pune Constitution Day Festival : महात्मा फुलेंच्या विचारांतून प्रेरणा घेऊन डॉ. आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केलीScience on Wheels Initiative India : विज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी ‘सायन्स ऑन व्हील्स’ उपक्रम राबविणारPune District Court Security : जिल्हा न्यायालयातील सुरक्षेसाठी एसओपी तयार करणारPashudhan Yojana Maharashtra : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण युवकांना उद्योजक बनवेल- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेDevendra Fadnavis : दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसJyotirao Phule Women’s Rights : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षे विशेषPune Court Attack Case : ५० हजारांची सुपारी, मध्यप्रदेशातून पिस्तूलांची खरेदीCensus 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा

कोकणला टोलमाफी, मराठवाड्याला का नाही?

कोकणला टोलमाफी, मराठवाड्याला का नाही?

गौरी-गणपतीसाठी गावी जाणाऱ्या मराठवाडावासीयांना विशेष टोलसवलतीची मागणी

marathinews24.com

पुणे – गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी मिळते; मग गौरी-गणपतीसाठी मराठवाड्यातील आपल्या गावी जाणाऱ्या नागरिकांना टोलमाफी का मिळू नये, असा सवाल मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे संस्थापक महेश टेळेपाटील यांनी उपस्थित केला आहे.

फिट इंडिया, प्रदूषणमुक्त पुण्यासाठी पाच हजार पुणेकरांचा उत्स्फूर्त सहभाग – सविस्तर बातमी 

पुणे-मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये स्थायिक झालेल्या मराठवाडावासीयांचे आपल्या मूळ गावाशी असलेले नाते आजही तितकेच घट्ट आहे. गौरी-गणपती हा त्यांच्यासाठी केवळ सण नसून कुटुंबाला पुन्हा एकत्र आणणारा आणि शहरातून गावाकडे परतण्याची परंपरा जपणारा सांस्कृतिक सोहळा आहे. कोकणातील गणेशभक्तांसाठी शासनाने यंदा विशेष टोलमाफीची व्यवस्था केली आहे. त्यामुळे त्याच धर्तीवर मराठवाड्यातील नागरिकांसाठीही विशेष सवलत देण्याची मागणी आता पुढे आली आहे.

“मराठवाडा हा महाराष्ट्राचा अविभाज्य सांस्कृतिक प्रदेश आहे. पुणे-मुंबईत स्थायिक झालेला मराठवाडावासी वर्षभर कुटुंबापासून दूर राहतो. गौरी-गणपतीच्या निमित्ताने तो आपल्या गावात परततो. शासनाने या भावनेचा विचार करावा. टोलमाफी ही केवळ आर्थिक सवलत नसून गावाशी जोडलेल्या भावनिक नात्याचा सन्मान आहे,” असे टेळेपाटील यांनी म्हटले आहे.

या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग, MSRDC तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निवेदन देण्यात येणार असून, मराठवाड्याकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवरील संबंधित पथकर नाक्यांवर गौरी-गणपतीच्या कालावधीत टोलमाफी लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. भौगोलिक अंतराने प्रदेश वेगळे असले तरी गौरी-गणपतीचा उत्सव महाराष्ट्राला भावनिक आणि सांस्कृतिक धाग्याने जोडतो. या सांस्कृतिक सेतूला शासनाच्या टोलसवलतीची जोड मिळणार का, याकडे आता मराठवाडावासीयांचे लक्ष लागले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×