शेतकऱ्यांना विविध योजना, अनुदान आणि कृषीविषयक सुविधांची माहिती
marathinews24.com
बारामती – तांदूळवाडी वेस येथील आबा गणपती गणेशोत्सव या मानाच्या गणेश मंडळात आयोजित (Agriculture Schemes Baramati) ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात सहाय्यक कृषी अधिकारी ओंकार चव्हाण यांनी गणेशभक्त व नागरिकांना कृषी विभागाच्या विविध योजना व सुविधांची माहिती दिली. शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि उपलब्ध सुविधांबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
पुण्यात १२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी गणेशस्तोत्र गायनातून रचला जागतिक रेकॉर्ड – सविस्तर बातमी
गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने Agriculture Schemes Baramati ‘लोकसंवाद-२०२६’ हे विशेष जनजागृती अभियान दि. २४ सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येत आहे.
यावेळी महाविस्तार एआय ॲप, शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी), पीक सल्ला, बाजारभाव, हवामान अंदाज तसेच पिकांवरील रोग-किडींचे नियंत्रण यांसह विविध सुविधांची माहिती देण्यात आली. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई), कृषी यांत्रिकीकरण, हंगामी मोहिमा, बियाणे प्रक्रिया व कीड-रोग नियंत्रण आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
Agriculture Schemes Baramati मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी यांसह विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानाची माहिती यावेळी देण्यात आली. शेतकऱ्यांनी आपल्या गरजेनुसार संबंधित शासकीय योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.






















