Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

Majhi Shala Majha Phala : ‘माझी शाळा, माझा फळा’ जिवंत देखाव्यातून शाळेच्या आठवणींना उजाळा

Majhi Shala Majha Phala : ‘माझी शाळा, माझा फळा’ जिवंत देखाव्यातून शाळेच्या आठवणींना उजाळा

पारंपरिक खेळांसह शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांचे प्रभावी सादरीकरण

marathinews24.com

पुणे – गोखलेनगर–जनवाडी परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाही जिवंत देखाव्याची परंपरा कायम ठेवत ‘Majhi Shala Majha Phala’ हा आगळावेगळा देखावा सादर केला आहे. या देखाव्याच्या माध्यमातून जुन्या शाळेच्या आठवणी, पारंपरिक खेळ तसेच सध्याच्या शिक्षण व्यवस्थेतील विविध प्रश्नांवर भाष्य करण्यात आले आहे.

कृषी विभागाच्या योजनांची ‘लोकसंवाद’मधून जनजागृती – सविस्तर बातमी 

Majhi Shala Majha Phala ‘गोड गोड शाळेच्या आठवणी छान, आठवणीच्या शाळेत चाल’ या गाण्यावर विद्यार्थ्यांनी कबड्डी, खो-खो, आंधळी कोशिंबीर, लंगडी, चिरगुटी तसेच दोरीवरच्या उड्या अशा पारंपरिक खेळांवर आधारित आकर्षक नृत्य सादर केले. या सादरीकरणातून बालपणीच्या शाळेतील रम्य आठवणींना उजाळा देण्यात आला.

तसेच ‘माझी म्हणू का’ या गाण्यावर विद्यार्थ्यांनी सध्याच्या शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर भाष्य करणारे सादरीकरण केले. पेपरफुटी, परीक्षा रद्द होणे, रस्ता रोको आंदोलन तसेच बदलती शिक्षणपद्धती यांसारख्या विषयांचे प्रभावी चित्रण या देखाव्यात करण्यात आले आहे.

जिवंत अभिनय, नृत्य आणि सामाजिक विषयांची सांगड घालत सादर करण्यात आलेल्या या देखाव्याला परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, गणेशोत्सव मंडळाचा हा उपक्रम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

Majhi Shala Majha Phala देखाव्यात निलम वैरागर,मनोज नगरकर, सुमित घोलप यांच्यासह किलबिल शाळा व जागृती संस्थेच्या पंधरा विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे. अशोक खुडे मंडळाचे अध्यक्ष असून उमेश वाघ, विनोद सकट, विवेक कांबळे अभिजीत धाडवे, नरेश कांबळे योगेश शिनगारे, सचिन सकटे, प्रशांत शिंदे, केतन गायकवाड, विलास खराडे, गौरव शिंदे प्रमुख पदाधिकारी आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×