Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

Agriculture Schemes Baramati : कृषी विभागाच्या योजनांची ‘लोकसंवाद’मधून जनजागृती

शेतकऱ्यांना विविध योजना, अनुदान आणि कृषीविषयक सुविधांची माहिती

marathinews24.com

बारामती – तांदूळवाडी वेस येथील आबा गणपती गणेशोत्सव या मानाच्या गणेश मंडळात आयोजित (Agriculture Schemes Baramati)  ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात सहाय्यक कृषी अधिकारी ओंकार चव्हाण यांनी गणेशभक्त व नागरिकांना कृषी विभागाच्या विविध योजना व सुविधांची माहिती दिली. शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि उपलब्ध सुविधांबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

पुण्यात १२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी गणेशस्तोत्र गायनातून रचला जागतिक रेकॉर्ड – सविस्तर बातमी 

गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने Agriculture Schemes Baramati ‘लोकसंवाद-२०२६’ हे विशेष जनजागृती अभियान दि. २४ सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येत आहे.

यावेळी महाविस्तार एआय ॲप, शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी), पीक सल्ला, बाजारभाव, हवामान अंदाज तसेच पिकांवरील रोग-किडींचे नियंत्रण यांसह विविध सुविधांची माहिती देण्यात आली. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई), कृषी यांत्रिकीकरण, हंगामी मोहिमा, बियाणे प्रक्रिया व कीड-रोग नियंत्रण आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

Agriculture Schemes Baramati  मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी यांसह विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानाची माहिती यावेळी देण्यात आली. शेतकऱ्यांनी आपल्या गरजेनुसार संबंधित शासकीय योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×