अग्निशमन जवानाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
marathinews24.com
पुणे – PMPML Bus Fire Pune : पुण्यात पीएमपीएमएल बसला आग अग्निशमन दलाचे जवान नेहमीच सतर्क राहून जिवित आणि वित्तहानी वाचविण्याचे कर्तव्य चोख बजावत असतात. आज असेच कसबा अग्निशमन केंद्र येथील जवान सुरेश पवार हे राञपाळी ड्युटी करुन काळेवाडीकडे दुचाकीवरून घरी जात असताना शिवाजीनगर चौकात पुणे स्टेशन ते निगडीकडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसच्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे निदर्शनास येताच पवार यांनी तात्काळ चालकाला सांगून बस थांबवत दलाच्या नियंत्रण कक्षात कळवले.
डेक्कन जिमखाना भागातील वस्त्रदालन, उपाहारगृहातून रोकड चोरीला – सविस्तर बातमी
PMPML Bus Fire Pune : पुण्यात पीएमपीएमएल बसला आग कसबा अग्निशमन वाहन येईपर्यंत चालक वाहक व पवार यांनी सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले होते. अग्निशमन वाहन पोहोचताच आगीवर पाण्याचा मारा करीत आग पुर्ण विझवत धोका दूर केला. अग्निशमन जवानाने प्रसंगावधान राखून केलेली कार्यवाही यामुळे मोठी दुर्घटना टळली. प्रवाशांनी अग्निशमन जवान व चालक वाहक यांनी दाखविलेल्या तत्परतेचे कौतुक करीत अग्निशमन विभागाच्या उत्तम कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले.





















