डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन
marathinews24.com
पुणे – गणेशोत्सव हा उत्साहासोबतच सामाजिक सलोखा, शांतता आणि शिस्तीचा संदेश देणारा उत्सव आहे. यंदाचा गणेशोत्सव अतिशय शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडावा, तसेच समाजात वाढत चाललेली हिंसा थांबून प्रत्येकाच्या सन्मानाचे रक्षण व्हावे. Neelam Gorhe Ganpati Darshan तसेच, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारला अधिकाधिक शक्ती मिळावी, समाजात शांतता व सलोखा नांदावा आणि प्रत्येक नागरिकाचा सन्मान जपला जावा, अशी अपेक्षा शिवसेना नेत्या व विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे (दि.१६)रोजी दर्शन घेत डॉ. गोऱ्हे यांनी विधिवत पूजा करून आरती केली. यावेळी त्यांनी पुणे पोलिसांकडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले. नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करून उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी योगदान द्यावे, Neelam Gorhe Ganpati Darshan असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले.
यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष तथा उत्सवप्रमुख पुनीत बालन, शिवसेना शहर संघटक आनंद गोयल, अभिनेते जितेंद्र जोशी व उपेंद्र लिमये उपस्थित होते.





















