मद्याच्या बिलावरुन वाद झाल्याची माहिती
marathinews24.com
पुणे – मद्याच्या बिलावरुन झालेल्या वादातून पिस्तुलातून गोळ्या झाडून हाॅटेल आणि बार चालकचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी शिरुर शहरात घडली. हाॅटेल चालक तरुणावर गोळीबार करणाऱ्या दोघे जण पसार झाले असून, आरोपींचा शोध घेण्यासाटी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. हरी गंगावणे (वय ३४, रा. शिरुर, जि. पुणे) Shirur Crime News असे खून झालेल्या हाॅटेल चालकाचे नाव आहे.
पुण्यातील लोहगावामधील ११ विनापरवाना हॉस्टेल सील – सविस्तर बातमी
शिरुरमधील डाॅ. आंबेडकरनगर परिसरात गंगावणे यांचे हाॅटेल आणि बार आहे. शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास गंगावणे दुचाकीवरुन लोटे गल्लीतून निघाले होते. गंगावणे यांच्याबरोबर मित्र होता. अरुंद गल्लीत दुचाकीचा वेग कमी होता. त्या वेळी दोघे हल्लेखोर चालत तेथे आले. गंगावणे यांच्यावर जवळून पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. (Shirur Crime News) गाेळीबारानंतर गंगावणे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. गंगावणे आणि त्यांचा सहप्रवासी मित्र दुचाकीवरुन खाली कोसळले. गंगावणे यांच्याबरोबर असलेल्या मित्राने हल्लेखाेरांचा पाठलाग केला. अरुंद गल्लीतून दोघे जण पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या गंगावणे यांना मित्राने तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच शिरुर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या गंगावणे यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.
Shirur Crime News ‘तीन महिन्यांपूर्वी मद्याच्या बिलावरुन आरोपी आणि गंगावणे यांच्यात वाद झाला होता. गंगावणे यांनी एका आरोपीला मारहाण केली होती. बुधवारी रात्री गंगावणे या भागातील एका मंडळाजवळ थांबले होते. आरोपीचा काका या परिसरात राहतो. आरोपी तेथे आल्यानंतर पु्न्हा वाद झाला. वाद झाल्यानंतर आरोपी तेथून निघून गेला. गंगावणे यांनी या घटनेची माहिती आरोपीच्या काकाला दिली. त्यानंतर आरोपीशी संपर्क साधून काकाने त्याला सुनावले. या घटनेनंतर आरोपी संतापला होता. शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास आरोपी आणि साथीदाराने पाळत ठेवून गंगावणे यांच्यावर गोळीबार केला’, अशी माहिती पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी दिली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत.






















