Breking News
Shubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एकLullanagar Roof Collapse : पुण्यात पत्र्याचे आच्छादन कोसळून दोघे जखमीShirur Crime News : शिरुरमध्ये हाॅटेल चालकाचा गोळ्या झाडून खूनLohegaon Hostel Sealing : पुण्यातील लोहगावामधील ११ विनापरवाना हॉस्टेल सील

Pune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटले

Pune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटले

तीन चोरट्यांविरुद्ध बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल 

marathinews24.com

पुणे – (Pune Crime News) प्रवासी तरुणाला धमकावून त्याच्याकडील रोकड लुटण्यात आल्याची घटना पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात घडली. या प्रकरणी तीन चोरट्यांविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत इरफान निजाम मोहम्मद (वय २७, सध्या रा. सुपा, ता. बारामती, जि. पुणे) याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इरफान मूळचा तेलंगणातील निजामाबादचा रहिवासी आहे. तो १८ सप्टेंबर रोजीसकाळी साडेनऊच्या सुमारास रेल्वे स्थानकाच्या आवरातील पार्सल कार्यालयाजवळ असलेल्या झाडाखाली आराम करत होता. त्या वेळी तीन चोरटे तेथे आले. ‘आमच्याकडे रागाने का बघतो’,अशी विचारणा करुन चोरट्यांनी इरफानशी वाद घालण्यास सुरुवात केली. (Pune Crime News) चोरट्यांनी त्याला मारहाण केली. त्याच्या खिशातील तीन हजारांची रोकड लुटून चोरटे पसार झाले. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक धुमाळ तपास करत आहेत.

विमान प्रवासी तरुणीच्या बॅगेतून ६० हजारांची रोकड चोरी

Pune Crime News विमान प्रवासी तरुणीच्या बॅगेतून ६० हजार रुपयांची रोकड लांबविण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी विमानतळ पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २३ वर्षीय तरुणी घाेरपडी गावातील एका सोसायटीत राहायला आहे. १६ सप्टेंबर रोजी तरुणी बँकाँकहून विमानाने पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर उतरली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तरुणीने तिच्याकडील पिशवीची तपासणी केली. तेव्हा पिश‌वीला लावलेले बॅगेज टॅग उघडल्याचे दिसून आले. तरुणीने पिश‌वीत पाचशे रुपयांच्या ६० नोटा ठेवल्या होत्या. पिश‌वीची पाहणी केल्यानंतर पिशवीत ठेवलेली ३० हजारांची रोकड चोरुन नेण्यात आल्याचे उघडकीस आले. तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार जाेगदंडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×