Breking News
Science on Wheels Initiative India : विज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी ‘सायन्स ऑन व्हील्स’ उपक्रम राबविणारPune District Court Security : जिल्हा न्यायालयातील सुरक्षेसाठी एसओपी तयार करणारPashudhan Yojana Maharashtra : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण युवकांना उद्योजक बनवेल- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेDevendra Fadnavis : दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसJyotirao Phule Women’s Rights : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षे विशेषPune Court Attack Case : ५० हजारांची सुपारी, मध्यप्रदेशातून पिस्तूलांची खरेदीCensus 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा26/11 Mumbai Attack Martyrs Tribute Pune : पुणे शहर पोलिसांसह पुणेकरांची मुंबई २६ / ११ हल्ल्यातील हुतात्म्यांना मानवंदना

Pune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटी

Pune Ganeshotsav

महापालिकेच्या तयारीची मंडळ पदाधिकाऱ्यांना माहिती; मेट्रो, पोलिस आणि पालिका प्रशासनाला आवश्यक नियोजनाच्या सूचना

marathinews24.com

पुणे – Pune Ganeshotsav : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी शहरातील प्रमुख गणेश मंडळांना भेटी देऊन उत्सवाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आणि सुविधांचा आढावा घेतला. त्यांनी मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ, अखिल मंडई मंडळ आणि साने गुरुजी मंडळांना भेट देत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

Pune Ganeshotsav

भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास – सविस्तर बातमी 

गणेशोत्सवासाठी पुण्यात राज्याच्या विविध भागांसह देशभरातून मोठ्या संख्येने भाविक दाखल होतात. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या सुविधा व उपाययोजनांची माहिती वाडेकर यांनी घेतली. भाविकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि इतर नागरी सुविधांबाबत प्रशासनाच्या नियोजनाचाही त्यांनी आढावा घेतला.

गणेशोत्सव काळात पुणे शहरातील प्रमुख गणेश मंडळांना भेट देणाऱ्या भाविकांसाठी मेट्रो सेवा महत्त्वाची ठरत असल्याचे वाडेकर यांनी सांगितले. मेट्रोमुळे मोठ्या संख्येने नागरिक शहराच्या मध्यवर्ती भागात पोहोचत असल्याने वाहतूक कोंडी कमी करण्यास तसेच भाविकांना सुलभ प्रवासाची सुविधा मिळण्यास मदत होत आहे. पुढील वर्षी हिंजवडी मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर मेट्रो प्रवाशांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याने त्याचा विचार करून आगामी गणेशोत्सवासाठी (Pune Ganeshotsav)  महापालिका आणि मेट्रो प्रशासनाने आतापासूनच आवश्यक नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

मेट्रो स्थानके तसेच प्रमुख गणेश मंडळांच्या परिसरात वाढणारी गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही वाडेकर यांनी नमूद केले. गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी त्यांनी पोलिस प्रशासनाकडे केली.

गणेशोत्सव (Pune Ganeshotsav) हा पुण्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनातील महत्त्वाचा उत्सव असून, दरवर्षी लाखो भाविक शहरातील मानाच्या आणि प्रमुख गणेश मंडळांना भेट देतात. भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि शिस्तबद्ध वातावरण मिळावे यासाठी महापालिका, मेट्रो प्रशासन, पोलिस आणि गणेश मंडळांनी परस्पर समन्वयाने काम करण्याची आवश्यकता असल्याचे वाडेकर यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×