Breking News
Science on Wheels Initiative India : विज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी ‘सायन्स ऑन व्हील्स’ उपक्रम राबविणारPune District Court Security : जिल्हा न्यायालयातील सुरक्षेसाठी एसओपी तयार करणारPashudhan Yojana Maharashtra : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण युवकांना उद्योजक बनवेल- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेDevendra Fadnavis : दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसJyotirao Phule Women’s Rights : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षे विशेषPune Court Attack Case : ५० हजारांची सुपारी, मध्यप्रदेशातून पिस्तूलांची खरेदीCensus 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा26/11 Mumbai Attack Martyrs Tribute Pune : पुणे शहर पोलिसांसह पुणेकरांची मुंबई २६ / ११ हल्ल्यातील हुतात्म्यांना मानवंदना

Pune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूक

Pune Courier Scam

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – वाहतूक नियमभंग केल्याची लिंक पाठवून एकाची सायबर चोरट्यांनी २ लाख ७९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तरुणाने नर्‍हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर (Pune Cyber Crime) चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३४ वर्षीय तरुण नर्‍हे भागात राहायला आहे. सायबर (Pune Cyber Crime) चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर एक लिंक पाठवली. वाहतूक नियम भंगाची लिंक तरुणाने उघडली. त्यानंतर चोरट्यांनी मोबाइलचा तांत्रिक ताबा (हॅक) घेतला. चोरट्यांनी बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवून तरुणाच्या खात्यातून २ लाख ७९ हजार रुपये लांबविले. ही रक्कम दुसर्‍या एका खात्यात वळविण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली.

पोलिसांकडून या प्रकरणाचा तांत्रिक तपास करण्यात येत असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे. अनोळखी क्रमांकावर वाहतूक नियमभंगाचे चलन किंवा लिंक पाठविण्यात आल्यास प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×