Breking News
Pune Court Attack Case : ५० हजारांची सुपारी, मध्यप्रदेशातून पिस्तूलांची खरेदीCensus 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा26/11 Mumbai Attack Martyrs Tribute Pune : पुणे शहर पोलिसांसह पुणेकरांची मुंबई २६ / ११ हल्ल्यातील हुतात्म्यांना मानवंदनाPune Vigyan Nandi Sammelan : विज्ञान साहित्यात ज्ञानभाषा व लोकभाषेचा संगम व्हायला हवाBaburao Shewale Hospital : लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक काम केल्यास परिसराचा कायापालट शक्य : सिद्धार्थ शिरोळेPune Cyber Crime News : पोलीस असल्याची बतावणी, जेष्ठाला ११ लाखांचा गंडाPune Crime News : धक्का लागल्यामुळे तरुणावर केला गोळीबारConstitution Day Rally Pune 2026 : संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्न

Pune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

Pune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

फरासखाना पोलिसांनी रक्कम ताब्यात घेत प्राप्तिकर विभागाकडे तपास सोपविला

marathinews24.com

पुणे – गणेशोत्सवात कसबा पेठेतील जिजामाता चौकात एकाकडे ४२ लाख रुपयांची रोकड सापडली. (Pune Cash Seizure) पिशवीत ठेवलेली ही रक्कम फरासखाना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम सापडल्याने हे प्रकरण तपासासाठी प्राप्तिकर विभागाकडे सोपविण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील जिजामाता चौकात शुक्रवारी (१८ सप्टेंबर) एकाकडे मोठी रोकड असल्याची माहिती फरासखाना पोलिसांना मिळाली.

पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले – सविस्तर बातमी 

बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी संबंधित व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिशवी पोलिसांनी ताब्यात घेतली. पोलिसांनी या घटनेची नोंद (स्टेशन डायरी) केली. मोठ्या प्रमाणावर रोकड का बाळगली ?, तसेच या रक्कमेचा स्त्रोत काय आहे? ही रक्कम का बाळगली?, याबाबतची माहिती पोलिसांकडून घेण्यात आली. (Pune Cash Seizure)  ‘पोलिसांनी याबाबतची माहिती प्राप्तिकर विभागाला दिली आहे. प्राप्तिकर विभागाकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे’, अशी माहिती फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×