Breking News
Baburao Shewale Hospital : लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक काम केल्यास परिसराचा कायापालट शक्य : सिद्धार्थ शिरोळेPune Cyber Crime News : पोलीस असल्याची बतावणी, जेष्ठाला ११ लाखांचा गंडाPune Crime News : धक्का लागल्यामुळे तरुणावर केला गोळीबारConstitution Day Rally Pune 2026 : संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्नAccident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’

Ganesh Visarjan Pune : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या विसर्जन सोहळ्याची रूपरेषा जाहीर

Ganesh Visarjan Pune : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या विसर्जन सोहळ्याची रूपरेषा जाहीर

सुवर्णगणेश धामातून सकाळी ८ वाजता श्रींचे प्रस्थान; सायंकाळी ६ वाजता मंडईतून विसर्जन मिरवणूक; मानाच्या पाचही गणपतींना पुष्पहार अर्पण करण्याची परंपरा

marathinews24.com

पुणे – गणेशोत्सवाच्या सांगता सोहळ्याची तयारी सुरू झाली असून, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने अनंत चतुर्दशीच्या दिवशी आयोजित करण्यात येणाऱ्या श्रींच्या विसर्जन मिरवणुकीची Ganesh Visarjan Pune रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे. सकाळी सुवर्णगणेश धाम येथे पूजाविधी, त्यानंतर रथातून मंडईतील टिळक पुतळ्याकडे प्रस्थान आणि सायंकाळी ६ वाजता मंडईतून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे – सविस्तर बातमी 

उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी ही माहिती दिली. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी साडेसात वाजता श्री सुवर्णगणेश धाम येथे श्रींची अनंत चतुर्दशी पूजा संपन्न होईल. आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, तसेच झोन १ पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांच्या सपत्नीक उपस्थितीत पूजाविधी पार पडणार आहे. पूजेनंतर सकाळी ८ वाजता श्री विघ्नहर्ता रथातून श्रींची मूर्ती सुवर्णगणेश धाम येथून मंडईतील टिळक पुतळ्याकडे विसर्जन Ganesh Visarjan Pune मिरवणुकीसाठी मार्गस्थ होईल.

मानाच्या पाचही गणपतींना पुष्पहार

पुण्याच्या गणेशोत्सवातील प्रथा आणि परंपरेनुसार टिळक पुतळा येथे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने मानाच्या पाचही गणपतींना पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहेत. मानाच्या गणपतींचे विसर्जन पार पडल्यानंतर पोलिस प्रशासनाने निश्चित केलेल्या वेळेनुसार सायंकाळी ६ वाजता मंडई येथून भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होईल.

Ganesh Visarjan Pune पुण्याच्या गणेशोत्सवाला लाभलेली समृद्ध परंपरा आणि संस्कृती जपत यंदाचा विसर्जन सोहळा भक्तिभावाने व उत्साहात पार पडावा, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होताना मिरवणुकीत शिस्त व शांतता राखावी. पर्यावरणाचे भान ठेवून पर्यावरणपूरक पद्धतीने गणरायाला निरोप देणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. सर्व गणेशभक्तांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाची सांगता करावी.”
– पुनीत बालन, उत्सव प्रमुख व विश्वस्त

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×