ऑनलाईन व्यवहार करताना नागरिकांनी सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन
marathinews24.com
पुणे – माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राज्यभर राबविण्यात येणाऱ्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत संत नगर युवा प्रतिष्ठान, संत नगर, लोहगाव येथे नागरिकांना सायबर गुन्हे आणि सायबर (Cyber Fraud Awareness Pune) फसवणुकीपासून बचावाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस अंमलदार बाजीराव वीर यांनी नागरिकांना सायबर फसवणुकीचे विविध प्रकार तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली.
आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली – सविस्तर बातमी
सोशल मीडियाचा गैरवापर, बनावट खात्यांद्वारे फसवणूक, अश्लील संदेश, मॉर्फ केलेले फोटो तसेच आर्थिक फसवणुकीच्या विविध प्रकारांपासून नागरिकांनी सावध राहावे. फिशिंग, ऑनलाइन शॉपिंग फ्रॉड, लोन ॲप फ्रॉड, टास्क फ्रॉड, अनोळखी एपीके फाइल, व्हॉइस क्लोनिंग, डिजिटल अरेस्ट, ट्रेडिंग फ्रॉड आणि क्रेडिट कार्ड फ्रॉड अशा प्रकारांमध्ये नागरिकांची फसवणूक होऊ शकते, असे श्री. वीर यांनी सांगितले.
टू-स्टेप ऑथेंटिकेशन सुरू ठेवणे, मजबूत पासवर्ड वापरणे, अनोळखी वाय-फाय नेटवर्कचा वापर टाळणे, अनोळखी स्रोतांमधून ॲप अथवा फाइल डाउनलोड न करणे आणि अनोळखी व्यक्तींना ऑनलाइन प्रतिसाद देताना काळजी घेणे आवश्यक आहे. कोणताही ऑनलाइन व्यवहार करण्यापूर्वी संबंधित माहितीची खातरजमा करावी, असे आवाहनही करण्यात आले.
Cyber Fraud Awareness Pune सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी तातडीने १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, अशी माहिती देण्यात आली.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक दिनेश राऊत, प्रवीण गुरव, समाधान फडतरे, संत नगर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश पवार आणि सचिव विकास माकने यांच्यासह नागरिक उपस्थित होते.




















