कोंढवा पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे – सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूलासह तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. त्याच्याकडून ७१ हजार ५०० रूपयांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. शेख अहमद उर्फ बबलू सुरज सय्यद (वय १९ रा. आदर्श चाळ, राजिव गांधी नगर, सुखसागरनगर, अप्पर बिबवेवाडी) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थीतीच्या अनुषंगाने ९ मे रोजी कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पथकाककडून पेट्रोलिंग केली जात होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव, हवालदार विशाल मेमाणे, निलेश देसाई, गोरखनाथ चिनके, लक्ष्मण होळकर, सुजित मदन, संतोष बनसुडे, सैफ पठाण संशयित आरोपींची तपासणी करीत होते. त्यावेळी हवालदार सतीश चव्हाण आणि विशाल मेमाणे यांना सराईत आरोपी पिस्तूलासह कोंढवा बुद्रूक परिसरात थांबल्याची माहिती मिळाली.
सराईत देशी बनावटीचे पिस्टलासह काही काडतुसे विक्रीसाठी थांबल्याची माहिती मिळताच पथकाने रात्री ९ मे रोजी साडेनउच्या सुमारास सापळा रचून शेख अहमद उर्फ बबलूला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पिस्टलसह ३ जिवंत काडतुसे मिळून आली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक रऊफ शेख, पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राकेश जाधव, विशाल मेमाणे, निलेश देसाई, गोरखनाथ चिनके, सतिश चव्हाण, लक्ष्मण होळकर, सुजित मदन, संतोष बनसुडे, सैफ पठाण, अभिजीत जाधव, अभिजीत रत्नपारखी, विकास मरगळे यांनी केली.