पावणे नऊ लाखाची फसवणूक
marathinews24.com
पुणे – सहलीच्या आमिषाने पर्यटकांची पावणेनऊ लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पर्यटन कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मुलांच्या भांडणावरून सुरू झालेला वाद फ्री स्टाईल हाणामारीवर पोहोचला – सविस्तर बातमी
याप्रकरणी प्रणीत सोरटे (वय ३२), प्रतीक सोरटे (वय ३३) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोरटे हे सख्खे भाऊ आहेत. दोघांनी कात्रज भागात फिनिक्स टुरिझम नावाची पर्यटन कंपनी सुरू केली होती. तक्रारदार वडगाव खुर्द भागात राहायला आहेत. सोरटे यांनी केरळ सहलीचे आमिष दाखविले होते. तक्रारदार आणि त्यांच्या परिचितांनी या सहलीसाठी नोंदणी केली होती.
सुरुवातीला त्यांच्याकडून एक लाख ९५ हजार ३५० रुपये घेतले. त्यानंतर त्यांनी सहल रद्द झाल्याचे सांगून त्यांना पैसे परत केले नाही. अशाच पद्धतीने दोघांनी आणखी काही जणांकडून पैसे घेतले. सहल रद्द केल्यानंतर त्यांनी पैसे परत न केल्याने सोरटे यांच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली. दोघांनी एकूण मिळून आठ लाख ७२ हजार ९२३ रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारदाराने फिर्यादीत नमूद केले आहे.