Breking News
Sugarcane Transport Safety Rules : साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुकीसाठी आरटीओचे सुरक्षा नियमPune Election 2026 : पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी मतदान साहित्य घेऊन पथके मतदान केंद्रांकडे रवानाPune Crime News : खुनाच्या प्रयत्नात ५ वर्षांपासून फरार आरोपीला बेड्याPune Domestic Harassment Cases : कौटुंबिक छळामुळे पुण्यात दोन महिलांनी केली आत्महत्याSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध जनजागृतीपर उपक्रमDeposit Fraud : छत्रपती मल्टीस्टेट सोसायटी प्रकरण; ठेवीदारांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहनPune Solapur Road Accident : दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यूPune Crime News : सराफी पेढीच्या भिंतीला छिद्र पाडून चोरीChakan Industrial Area Development : प्रशासन आणि उद्योजकांच्या समन्वयातून चाकण औद्योगिक क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधावाSrinagar Dussehra Celebration : श्रीनगरमध्ये दसऱ्याचा उत्साह; सामाजिक सलोख्याचे दर्शन

Sugarcane Transport Safety Rules : साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुकीसाठी आरटीओचे सुरक्षा नियम

Baramati News, Sugarcane Transport Safety, Baramati RTO, Sugar Factory News, Road Safety Maharashtra, Sugarcane Harvesting Season, RTO Safety Rules, Surendra Nikam, Rahul Gawade, Overloaded Vehicles, Tractor Safety, Traffic Rules Maharashtra, Road Accident Prevention, Baramati Sugar Factories, बारामती बातम्या, ऊस वाहतूक सुरक्षा, बारामती आरटीओ, साखर कारखाने, गळीत हंगाम, रस्ता सुरक्षा नियम, ऊस वाहतूक अपघात, वाहनांवरील रिफ्लेक्टिव्ह पट्टी, ओव्हरलोडिंगवर कारवाई, मद्यपान करून वाहन चालवणे, मोटार वाहन कायदा, सुरेंद्र निकम, साखर कारखाना बातम्या, अपघात प्रतिबंधक उपाययोजना, महाराष्ट्र वाहतूक नियम

अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना

marathinews24.com

बारामती – साखर कारखान्यांच्या गळीत हंगामादरम्यान ऊस वाहतूक करताना होणारे अपघात रोखण्यासाठी बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) वतीने विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी बारामती येथे आयोजित बैठकीत दिल्या.(Sugarcane Transport Safety Rules)  बैठकीला बारामती कार्यक्षेत्रातील विविध साखर कारखान्यांचे शेती अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे, अनिल शेलार उपस्थित होते.

पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी मतदान साहित्य घेऊन पथके मतदान केंद्रांकडे रवाना – सविस्तर बातमी 

ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी वाहनाची सर्व वैध कागदपत्रे सोबत ठेवावीत, तसेच वाहनामध्ये प्रमाणापेक्षा जास्त ऊस भरू नये. वाहनाच्या पाठीमागील भागाला रिफ्लेक्टिव्ह टेप आणि रिफ्लेक्टिव्ह पट्टी लावून ती लाल रंगाची असावी. ट्रॅक्टरद्वारे ऊस वाहतूक करताना वाहनाचा वेग मर्यादित ठेवावा आणि वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे.

ऊस वाहतूक बहुतांश वेळा रात्री होत असल्याने वाहनचालकांनी मद्यप्राशन करून वाहन चालवू नये. तसेच वाहनांमध्ये मोठ्या आवाजात स्पीकर लावू नयेत, अशा सूचनाही देण्यात आल्या. या सर्व नियमांची तपासणी संबंधित साखर कारखान्यांच्या एन्ट्री गेटवर करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले. साखर कारखाना संचालक मंडळांनी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांसाठी रस्ता सुरक्षा, वाहतुकीदरम्यान घ्यावयाची काळजी आणि अपघात प्रतिबंधक उपाययोजनांबाबत प्रबोधनात्मक शिबिरांचे आयोजन करून मार्गदर्शन करावे, असे आवाहन निकम यांनी केले.

सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार वायुवेग पथकामार्फत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही परिवहन विभागाने दिला.
या बैठकीस दौंड शुगर, भीमा शुगर, कर्मयोगी शुगर, बारामती ॲग्रो, सोमेश्वर साखर कारखाना, माळेगाव साखर कारखाना आणि छत्रपती साखर कारखान्यांचे शेती अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. ऊस वाहतूक सुरक्षित, अपघातमुक्त आणि नियमबद्ध करण्यासाठी साखर कारखाने, वाहनचालक आणि परिवहन विभाग यांनी समन्वयाने काम करावे, असेही निकम यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×