बालेवाडीतील तरूणाला सायबर चोरट्यांनी फसवले
marathinews24.com
पुणे – गोल्ड ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तरूणाला तब्बल ४० लाख २६ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १४ जुलै ते २६ ऑगस्ट २०२४ कालावधीत बालेवाडीत घडली आहे. याप्रकरणी नरेशकुमार मुस्तारी [वय ३७, रा. बालेवाडी] यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइल धारकांविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
कात्रजमध्ये रस्ता ओलांडणार्या पादचार्याला उडविले, टेम्पो चालक पसार – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार नरेशकुमार कुटूंबियासह बालेवाडीत राहायला असून, १४ जुलैला सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर मेसेज केला. त्यांना गोल्ड ट्रेडींग संदर्भात मेसेज करून लिंक पाठविली. काही दिवसांत सायबर चोरट्यांनी त्यांचा विश्वास संपादित केला. त्यांना गोल्ड ट्रेंडीगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानुसार नरेशकुमार यांनी गुंतवणूकीला सुरूवात केली. एक महिन्यांत तब्बल ४० लाखांवर रक्कम गुंतवणूक केली. मात्र, संशय आल्यामुळे त्यांनी पुन्हा संबंधित फोनकर्त्यांला विचारणा केली. त्यावेळी त्यांना उत्तर न मिळता संपर्क बंद करण्यात आला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नरेशकुमारने तातडीन पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत तपास करीत आहेत.