पोलिसांचा कल्याणीनगर भागात छापा; व्यवस्थापकासह दोघे अटकेत
marathinews24.com
पुणे – मसाज पार्लरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला. कारवाईत पोलिसांनी तीन तरुणींना ताब्यात घेतले असून, तरुणींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी व्यवस्थापकासह दोघांना अटक केली आहे. हर्षवर्धनसिंग भारत मोडासीया (वय २२, रा. कोरेगाव पार्क) आणि आसाफुल इस्लाम मुजिबुर रहिमान (वय २३, मूळ रा. आसाम) यांना अटक करण्यात आली. पोलीस कर्मचारी मयुरी नलावडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कपडे विक्रेत्याची तब्बल साडेतीन कोटींची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर भागात ‘निद्रा बॉडी स्पा’ येथे मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सूरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली. पोलिसांनी तेथे छापा टाकला. कारवाईत पोलिसांनी तीन तरूणींची ताब्यात घेतले, तसेच दोघांना अटक केली. मसाज पार्लरचालक जुनैद फारूख शेख हा पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.
आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार (पिटा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडा पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय ठाकर तपास करत आहेत. बाणेर भागातील दोन मसाज पार्लरवर पोलिसांनी छापे टाकून कारवाई केली होती. मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.