४ लाख ५४ हजारांचे दागिने चोरले
marathinews24.com
पुणे – फ्लॅटला रंगकाम करीत असताना घर मालकाची नजर चुकवून कामगाराने तब्बल ४ लाख ५४ हजारांच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. ही घटना ११ मे रोजी काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुमार प्रिन्स टाउनसमोरील एनआयबीएम एक्सटेंशनमध्ये घडली आहे. याप्रकरणी महिलेने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार संबंधित चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीएमपीएल बसप्रवासात महिलेची सोन्याची पाटली चोरीला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कुटूंबियासह काळेपडळ परिसरातील कुमार प्रिन्स टाउनसमोरील एनआयबीएम एक्सटेंशनमध्ये राहायला आहे. त्यांच्या राहत्या फ्लॅटचे रंगरोटीचे काम सुरू होते. रंगकाम करणार्याने घरातील लोकांची नजर चुकवून, टेबलावरील साडेचार लाखांहून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. रंगकाम करणार्याने मारला दागिन्यांवर डल्लादागिने दिसून न आल्यामुळे तक्रारदार महिलेला संशय बळावला. त्यानुसार त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली. सहायक पोलीस निरीक्षक विलास सुतार तपास करीत आहेत.
वाघोलीत घरफोडी, दोन लाखांचे दागिने चोरीला
पुणे- बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी करीत २ लाख ७ हजार रूपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना ९ ते १८ मे कालावधीत वाघोलीतील शांभवी पॅलेस, सत्यम पार्कमध्ये घडली आहे. याप्रकरणी महिलेने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरट्यांचा माग काढला जात असल्याची माहिती वाघोली पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल तपास करीत आहेत.