Breking News
आपला थक्क करणारा इतिहास मुलांना समजण्यासाठी बालसाहित्याची निर्मिती व्हावी- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलहडपसरमधील हॉटेलच्या शौचालयात महिलेचे चित्रीकरण; आरोपी अटकेतपुण्यातील टेकड्यांच्या संरक्षणासाठी मंजूर 26 कोटींचा निधी वापरात नाहीपोलीस तक्रार केल्याच्या रागातून तरुणावर केला गोळीबारमहाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे राज्य – उद्योग मंत्री उदय सामंतस्वारगेट एसटी स्थानकात प्रवाशांचे दागिने चोरणार्‍या महिलेला अटकपुण्यात तब्बल १ कोटी १३ लाखांवर गुटखा, सिगारेट जप्तशासकीय संस्थांकरिता पाण्याच्या टाक्यांचे वितरणक्रेडीट कार्ड योजनेच्या नावाखाली जेष्ठाची १० लाखांची फसवणूकथेउर फाटा परिसरात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

शासकीय संस्थांकरिता पाण्याच्या टाक्यांचे वितरण

शासकीय संस्थांकरिता पाण्याच्या टाक्यांचे वितरण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले वितरण

marathinews24.com

बारामती – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तालुक्यातील विविध शासकीय संस्थेकरिता उद्योजकांच्यावतीने दिलेल्या पिण्याचे पाणी साठवणुकीसाठी १ हजार लिटर क्षमतेच्या ६० टाक्या वितरित करण्यात आल्या.
पंचायत समिती परिसरात आयोजित कार्यक्रमावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) बारामती प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, गट शिक्षण अधिकारी निलेश गवळी, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुशीलकुमार सोमाणी, उद्योजक उपस्थित होते.

रायगडच्या रोहा एमआयडीसीत ‘सीट्रिपल आयटी’ मंजूर; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुढाकार यशस्वी – सविस्तर बातमी 

शासकीय संस्थांकरिता पाण्याच्या टाक्यांचे वितरण

पवार म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, याकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालयाच्यावतीने बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक शाळा आणि पशुसंवर्धन दवाखान्यांना १ हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या साठवण टाक्यांचे वाटप करण्यात आले. यामुळे अंगणवाडीतील बालक, विद्यार्थी, कर्मचारी तसेच नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळणार आहे.

आगामी मान्सून काळात स्थानिक पातळीवर स्वच्छता, पाणी, आजारांवर त्वरित उपचार, आवश्यकतेनुसार कीटक नाशकांची फवारणी आदी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना ग्रामपंचायतींनी कराव्यात, अशा सूचना पवार यांनी यावेळी केल्या. पवार यांच्या हस्ते शरद सूर्यवंशी, खंडु गायकवाड, सुरेश परकाळे, दिलीप भापकर, प्रशांत जगताप आणि शंकर साळुंखे या उद्योजकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.

एमआयडीसी प्रादेशिक कार्यालय आणि पंचायत समिती यांचा संयुक्त प्रयत्न

बारामती पंचायत समितीच्यावतीने तालुक्यातील अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक शाळा, पशुसंवर्धन दवाखाने शासकीय संस्थांना पिण्याच्या पाणी साठवणूकीकरिता टाक्या मिळण्याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाकडे मागणी करण्यात आली होती. या अनुषंगाने प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या उद्योजकांना पाण्याच्या टाक्या उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यालयाच्यावतीने आवाहन केले असता, उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद देत सुरुवातीला या ६० टाक्या उपलब्ध करुन दिल्या आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top