जुन्या भांडणाच्या रागातून ३ लाख रुपयांची चैन हिसकावली
marathinews24.com
पुणे – जुन्या भांडणाच्या रागातून तरूणाच्या गळ्यातील तब्बल ३ लाख रूपये किमतीची सोन्याची चैन हिसकावून नेल्याची घटना २३ मे रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास रामोशी गेट परिसरात घडली आहे. याप्रकरणी विक्रांत विठ्ठल गिते (वय ३२ रा. भवानी पेठ) याला पोलिसांनी अटक केली आहे. चेतन अनिल जाधव (वय ३३, रा. मार्केटयार्ड) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
मनी लॉड्रींगच्या केसची दिली धमकी, तरूणाला २० लाखांचा गंडा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विक्रांत गिते आणि चेतन जाधव यांच्यात काही दिवसांपुर्वी भांडण झाले होते. त्याच रागातून २३ मे रोजी रात्री आठच्या सुमारास आरोपीन गितेने चेतनला रामोशी गेट परिसरात गाठले. त्याला हाताने मारहाण करीत गळ्यातील ३ लाख रूपये किंमतीची सोन्याची चैन हिसकावून नेली. याप्रकरणी तक्रार दाखल होताच, खडक पोलिसांनी आरोपीचा माग काढून त्याला अटक केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक कुदळे तपास करीत आहेत.