Breking News
Mahatma Jyotirao Phule : क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष विविध उपक्रमांनी साजरे करण्याचे आवाहनKharadi Bypass Robbery Case : पादचारी जेष्ठेच्या अंगावर पाणी उडवून लुटलेLost Mobile Recovery : वाघोली पोलिसांनी तक्रादारांच्या चेहर्‍यावर फुलवले हसूPune Crime News : पुण्यात पार्किंगच्या वादातून हाणामारीच्या घटनाBopdev Ghat Car Accident : बोपदेव घाटात वाहनाच्या धडकेत मोटार दरीत कोसळलीSugarcane Transport Safety Rules : साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुकीसाठी आरटीओचे सुरक्षा नियमPune Election 2026 : पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी मतदान साहित्य घेऊन पथके मतदान केंद्रांकडे रवानाPune Crime News : खुनाच्या प्रयत्नात ५ वर्षांपासून फरार आरोपीला बेड्याPune Domestic Harassment Cases : कौटुंबिक छळामुळे पुण्यात दोन महिलांनी केली आत्महत्याSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध जनजागृतीपर उपक्रम

तोतया वकील स्नेहल कांबळेविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल

ज्येष्ठ महिलेची ५ लाखांची फसवणूक

marathinews24.com

पुणे – तोतया वकील स्नेहल कांबळेविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांबळेने वकील असल्याची बतावणी करुन आतापर्यंत तिघांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. तिच्याविरुद्ध फसवणुकीचे आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पीएमपीएल बसप्रवासात महिलेचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी

वकील असल्याची बतावणी करुन मुलाला घटस्फोट मिळवून देते, असे आमिष दाखवून कांबळेने एका ज्येष्ठ महिलेची पाच लाख ३० हजारांची फसवणूक केली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नुकतीच फिर्याद दिली. कांबळेविरुद्ध दाखल झालेला हा तिसरा गुन्हा आहे. कांबळे सध्या पोलीस कोठडीत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहल कांबळेने ज्येष्ठ महिलेकडे वकील असल्याची बतावणी केली. महिलेचा मुलगा आणि सूनेमध्ये वाद सुरू होते. घटस्फोट मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर ज्येष्ठ महिलेकडून कांबळेने वेळोवेळी रोख स्वरूपात पैसे घेतले. अटकेची भीती दाखविली, तसेच पोलिसांना पैसे द्यावे लागतील, असे सांगून पैसे उकळले. कांबळेने महिलेची पाच लाख ३० हजारांची फसवणूक केली. कांबळेविरुद्ध फसवणूक, तसेच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी कांबळेने महिलेला जाळ्यात ओढले होते. मुलाला घटस्फोट मिळवून देते, असे आमिष दाखवून सहा लाख रुपये घेतले होेते. दुसऱ्या एका प्रकरणात एका महिलेच्या विवाहित मुलीला न्याय मिळवून देते, पतीच्या ताब्यातून मुलगा मिळवून देते, असे सांगून एक लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केली होती.

पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन

आरोपी स्नेहल कांबळेने वकील असल्याची बतावणी करुन अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. घटस्फोट, चोरी, बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात येईल, अशी भीती दाखवून तिने तक्रारदारांकडून पैसे उकळले आहेत. तिच्याविरुद्ध तक्रार असल्यास तक्रारदारांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, असे आवाहन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×