भवानी पेठेतील सोसायटीत भरदिवसा घरफोडी

विश्रामबाग परिसरात घरफोडी, ११ लाखांचा ऐवज चोरीला

खडक पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सोसायटीत भरदिवसा घरफोडी झाल्याचा प्रकार भवानी पेठेत उघडकीस आला आहे. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील रोकड आणि दागिने असा ८० हजार ५०० रुपयांचा ऐवज लांबविला.
याबाबत एका महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सराफी पेढीतून तब्बल साडेचार कोटींच्या दागिन्यांची चोरी; विश्रामबाग पोलिसांकडून कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला भवानी पेठेतील चुडामण तालीम परिसरातील ओवेरा एनक्लेव्ह सोसायटीत राहायला आहेत. शनिवारी (३१ मे) सकाळी साडेदहाच्या सुमारास त्या सदनिका बंद करुन बाहेर पडल्या. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी रोकड आणि दागिने असा ऐवज लांबविला. दुपारी साडेतीनच्या सुमारास त्या घरी परतल्या. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला.

पोलीस कर्मचारी शशिकांत तुळसुलकर तपास करत आहेत. दरम्यान, उन्हाळी सुटीत अनेकजण सहकुटुंब परगावी जातात. सोसायटीतील बंद सदनिकांची पाहणी करुन चोरटे घरफोडीचे गुन्हे करतात. गेल्या काही दिवसांपासून शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कोथरूड भागातील भुसारी काॅलनीत सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी १७ लाखांचे दागिने चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top