Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

सराफी पेढीतून तब्बल साडेचार कोटींच्या दागिन्यांची चोरी

विश्रामबाग पोलिसांकडून कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – प्रसिद्ध सराफी पेढीतील कर्मचारी तरुणाने साडेचार कोटी रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कर्मचाऱ्याविरुद्ध अपहार, तसेच चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

रेल्वे प्रवासी ज्येष्ठ महिलेचे साडेचार लाखांचे दागिने लंपास – सविस्तर बातमी

याप्रकरणी प्रतीक नगरकर (वय ३५, रा. सुतारदरा, कोथरूड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नीलकंट ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापक नितीन इरप्पा डांगे (वय ३७, रा. सांगवी) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नगरकर हा नारायण पेठेतील पत्र्या मारुती चौकातील नीलकंठ ज्वेलर्समध्ये सेल्मसन म्हणून काम करत होता. नगरकर याच्याकडे अंगठी, सुवर्ण नाणी, वेढणी या आभुषणांची विक्री करणाऱ्या दालनाची जबाबदारी होती. १ एप्रिल ते २६ मे २०२५ या कालावधीत त्याने चार कोटी ५८ लाख रुपयांचे दागिने चोरले. दालनातील दागिन्यांचा अपहार केल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे तपास करत आहेत. पोलिसांनी सराफी पेढीतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे.

नगरकर याने दोन हजार २६२ ग्रॅम वजनाच्या १८० वेढण्या, तसेच दोन हजार ४२६ ग्रॅम वजनाची ९४ सुवर्ण नाणी (काॅईन) असा ऐवज चोरला असून, चोरलेल्या ऐवजाचे मूल्य एकूण मिळून चार कोटी ५८ लाख रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×