Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

वादातून मोटार चालकाने दाम्पत्याला केली मारहाण

बिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वार

आंबेगाव परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – किरकोळ वादातून मोटारचालकाने दाम्पत्याला काठीने बेदम मारहाण केल्याची घटना कात्रज भागातील आंबेगाव परिसरात घडली. मारहाणीत महिलेचा पाय फ्रॅक्चर झाला असून, याप्रकरणी मोटारचालकाविरुद्ध आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशाल महेंद्र शिंदे (वय ३२, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात दीड वर्षात शस्त्र परवान्याचे ४०४ अर्ज फेटाळले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शिंदे आणि त्यांची पत्नी सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांच्या मोटारीतून नवले पुलाकडून कात्रजकडे निघाले होते. त्या वेळी वळताना अचानक दुसरी मोटार आली. मोटारचालकाने मोटार रस्त्यात थांबविली आणि पाठीमागे नेण्यास सुरुवात केली. शिंदे यांनी मोटारीचा हाॅर्न वाजविला. ‘थोडी अक्कल वापरा,’ असे शिंदे मोटारचालकाला म्हणाले. या कारणावरून आरोपी मोटारचालक आणि शिंदे दाम्पत्यात वाद झाला.

मोटारचालकाने शिंदे आणि त्यांच्या पत्नीला काठीने बेदम मारहाण केली. मारहाणीत शिंदे यांच्या पत्नीचा पाय फॅक्चर झाला असून, मोटारचालक शिंदे जखमी झाले आहेत. दाम्पत्याला मारहाण करून मोटारचालक तेथून पसार झाला. पसार झालेल्या मोटारचालकाचा शोध घेण्यात येत असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×