Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

हगवणे कुटुंबीयांचा आणखी एक धक्कादायक कारनामा उघडकीस

हगवणे कुटुंबीयांचा आणखी एक धक्कादायक कारनामा उघडकीस

तीन तोतया बँक अधिकाऱ्यांना अटक

marathinews24.com

पिंपरी – माहेरहून दोन कोटी रुपये आणण्यासाठी सुनेचा छळ करून तिला आत्महत्येस भाग पाडलेल्या हगवणे कुटुंबीयांचा आणखी एक धक्कादायक कारनामा उघडकीस आला आहे. प्रशांत येळवंडे याला विक्री केलेल्या जेसीबी मशीन चा बेकायदेशीर ताबा घेण्यासाठी हगवणे कुटुंबीयांनी चक्क बनावट बँक अधिकारी पाठवून जेसीबी मशीन चा ताबा घेतल्याचं पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

महापालिकेचा विकास आराखडा बिल्डर धार्जिणा? – सविस्तर बातमी 

याप्रकरणात म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी योगेश राजेंद्र रासकर (वय २५), गणेश रमेश पोचले (वय ३०) आणि वैभव मोहन पिंगळे (वय २७) या तीन तोतया बँक कर्मचाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

तक्रारदार प्रशांत येळवंडे यांनी लता आणि शशांक हगवणे यांच्याकडून 24 लाख रुपये जेसीबी मशीन खरेदी केली होती. प्रशांत येळवंडे ह्याने जेसीबी मशीन व्यवहाराचे पैसे हगवणे कुटुंबीयांना दिल्यानंतरही, कुटुंबीयांनी तोतया बँक अधिकारी पाठवून प्रशांत येरवंडे यांच्या ताब्यातून जेसीबी मशीन बेकायदेशीर जप्त केली होती.

या प्रकरणात प्रशांत येरवंडे यांच्या तक्रारीवरून लता हगवणे आणि शशांक हगवणे यांना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी आधीच अटक केली आहे. त्यांच्याकडे केलेल्या तपासानंतर महाळुगे एमआयडीसी पोलिसांनी योगेश राजेंद्र रासकर, गणेश रमेश पोतले आणि वैभव मोहन पिंगळे या तीन तोतया बँक अधिकाऱ्यांना देखील बेड्या ठोकल्या आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×