टँकरचालकाने दुचाकीस्वाराला दिली धडक, महिला ठार

टँकरचालकाने दुचाकीस्वाराला दिली धडक, महिला ठार

बाप-लेक गंभीर जखमी, सहकारनगरधील घटना

marathinews24.com

पुणे – भरधाव टँकर चालकाने दुचाकीस्वाराला पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार कुटूंबिय खाली पडून महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बाप-लेक जखमी झाले आहेत. हा अपघात ७ जूनला रात्री साडे अकराच्या सुमारास सहकारनगरमधील चव्हाणनगर कमान चौकात घडला आहे. रूमी अजित पाल (वय २७ रा. संतोषनगर, कात्रज) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अजित पाल (वय ३१) आणि त्यांचा मुलगा अपघातात गंभीररित्या जखमी झाला आहे. याप्रकरणी टँकर चालकाविरूद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील तीन वाहतूक अमलदारांचे तडकाफडकी निलंबन – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पाल हे ७ जूनला रात्री सव्वा अकराच्या सुमारास त्यांच्या मुलासह पत्नी रूमीसोबत दुचाकीवरून घरी चालले होते. सहकारनगरमधील चव्हाणनगर कमान चौकात भरधाव टँकर चालकाने पाल यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील पाल कुटूंबिय खाली पडल्यामुळे गंभीररित्या जखमी झाले. अपघातानंतर आजूबाजूला जमलेल्या नागरिकांनी तातडीने स्थानिक पोलिसांसह रूग्णवाहिकेला पाचारण केले. तिघांनाही जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, रूमीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलीस उपनिरीक्षक रेश्मा साळुंखे तपास करीत आहेत.

डंपरच्या धडेकत महाविद्यालयीन तरूणी झाली होती ठार

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरूणी ठार झाल्याची घटना नुकतीच विश्रांतवाडी भागात घडली आहे. एकता भरत पटेल (वय २३, रा. विद्यानगर, पिंपळे गुरव) असे मृ्त्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. याप्रकरणी डंपरचालक त्र्यंबक शेरखाने (वय ३८, रा. ओैंध) याला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. एकता लोहगावमधील महाविद्यालयात शिक्षण घेत होती. विश्रांतवाडीतून येरवडा कारागृहाकडे जाणार्‍या रस्त्याने निघाली होती. कॉमर झोन कंपनीजवळ महापालिकेच्या कचरा वाहतूक करणार्‍या डंपरने दुचाकीस्वार एकताला धडक दिली. चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डंपरचालक शेरखाने याला ताब्यात घेण्यात आले.

पुण्यात १५ दिवसात १० जणांनी गमाविला जीव

शहरासह उपनगरात मागील १५ दिवसांत १० जणांनी जीव गमविला आहे. बहुतांश घटनांत मोटार चालकासह डंपर, टँकर, टेम्पो चालकाच्या बेदरकारपणामुळे सर्वसामान्यांना प्राणाला मुकावे लागले आहे. दरम्यान, गंभीर स्वरुपांच्या अपघातांच्या घटनेत वाढ झाली आहे. दोन आठवड्यात वेगवेगळ्या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून, त्यात तीन अल्पवयींनाचा समावेश आहे. त्यामुळे बेशिस्त वाहन चालकांविरूद्ध कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×