रुबी हॉलध्ये काम करणार्‍या डॉक्टरने वसतीगृहात घेतला गळफास

रुबी हॉलध्ये काम करणार्‍या डॉक्टरने वसतीगृहात घेतला गळफास

चिठ्ठीत लिहला मोबाइलचा पासवर्ड, पोलिसांनी तपासाला गती

marathinews24.com

पुणे – शहरातील नामांकित रुबी हॉल क्लिनिकमध्ये काम करणार्‍या निवासी डॉक्टरने वसतीगृहात गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या खोलीत पोलिसांना चिठ्ठी मिळून आली असून, त्यामध्ये मोबाइलचा पासवर्ड लिहण्यात आला आहे. त्यामुळे तांत्रिक विश्लेषणानंतरच संबंधित डॉक्टरने आत्महत्या का केली, हे स्पष्ट होणार असल्याचे कोरेगाव पार्क पोलिसांनी स्पष्ट केले आहे. डॉ. श्याम व्होरा (वय २८, रूबी हॉल वसतीगृह, मूळ-गुजरात) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. डॉक्टरच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली असून, सहकार्‍यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

मोटारीची काच फोडून ५ लाखांची रोकड लंपास – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ श्याम हे मागील काही महिन्यांपासून रूबी हॉल क्लिनिकमध्ये कार्यरत होते. ते रूग्णालयाच्या वसतीगृहात राहत असताना रविवारी (दि. ८) त्यांनी दिवसभर दरवाजा उघडला नाही. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी आवाज देउन त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, डॉ. व्होराने बराच वेळ दरवाजा उघडला नाही म्हणून सुरक्षा रक्षकांनी रात्री साडेनउच्या सुमारास दरवाजा तोडला. तेव्हा डॉ. श्याम व्होरा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. सुरक्षारक्षकाने तातडीने रूग्णालय प्रशासनासह पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार कोरेगाव पार्क पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला गती दिली होती.

डॉ. श्याम व्होरा ज्याठिकाणी राहत होते, त्या खोलीत पोलिसांना चिठ्ठी मिळून आली आहे. संबंधित चिठ्ठत मोबाईलचा पासवर्ड लिहून ठेवला आहे. त्यामुळे पोलिसांनी मोबाईल तपासासाठी ताब्यात घेतला आहे. तपासाअंती त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकेल. डॉ. श्याम हे मूळचे गुजरातमधील असून त्यांच्या आत्महत्यबाबत कुटूंबाला पोलिसांनी माहिती दिली आहे. त्यानुसार डॉक्टरांचे कुटूंबिय पुण्याकडे मार्गस्थ झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, डॉ. श्यामने आत्महत्या का केली, त्यांच्यावर कोणाचा दबाव होता, हे सर्व तांत्रिक विश्लेषणानंतर स्पष्ट होणार आहे.

रूग्णालयातील डॉक्टर सहकार्‍यांमध्ये खळबळ

डॉ. श्याम अतिशय हुशार अन हसर्‍या स्वभावाचे होते. रूग्णालयातील सर्वच कर्मचार्‍यांसह वरिष्ठ डॉक्टरांसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. मात्र, त्यांनी केलेल्या आत्महत्येमुळे इतर सहकार्‍यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, याप्रकरणी रुग्णालयातील कोणताही डॉक्टर घटनेसंदर्भात प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. डॉ. व्होरा याच्यावर कामाचा तणाव होता की इतर काही हे अद्यापही समजू शकले नाही. मात्र डॉ.व्होरा यांच्या आत्महत्येमुळे सहकार्‍यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

चौकशी पुर्ण होईपर्यंत निष्कर्ष काढू नये – रुबी हॉल क्लिनिक

आमच्या निवासी डॉक्टरांपैकी असलेले डॉ. श्याम व्होरा यांनी त्यांच्या वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केली. ही दुदैवी बातमी सांगताना आम्हाला खूप दुःख होत आहे. पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. कामाच्या ठिकाणी होणार्‍या छळाबाबत सुरू असलेले अंदाज पूर्णपणे निराधार आहेत. पोलीस अधिकारी त्यांची चौकशी पूर्ण करेपर्यंत निष्कर्ष काढण्यापासून किंवा अंदाव वर्तवण्यात येऊ नये, असे आवाहन रुबी हॉल क्लिनिकच्यावतीने कायदेशीर सल्लागार मंजुषा कुलकर्णी यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×