Breking News
“मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज” : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजननाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करुन महसूल सप्ताह यशस्वी करा…दुकानातून टायर चोरणारा गजाआडराज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सिम्बायोसिसचे संस्थापक पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांचा ९० व्या वाढदिवसानिमित्त सन्मानउप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कारवाईत साडेआठ लाख रुपयांहून अधिक दंड वसूलभारती विद्यापीठ ‘आयएमईडीमध्ये बीबीए, बीसीए विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रामपुण्यातील तो कुंटणखाना ३ वर्षांसाठी सीलबंदमोबाईल न विचारता वापरला, वादातून तरुणाचा खूनअण्णा भाऊ साठे यांचे साहित्य विश्वात्मक मानदंड निर्माण करणारे-डॉ. श्रीपाल सबनीस

डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या वाहन चालकाचे निधन

प्रामाणिक आणि उत्तम ड्रायव्हर दस्तगीर भाई, फेसबुक पोस्ट व्हायरल

marathinews24.com

पुणे – राज्यभरात संघटनेचे काम करत असताना माझ्या गाडीचे १२ वर्षे ड्रायव्हर असणारे दस्तगीर मुलाणी यांचे नुकतेच निधन झाले. हे ऐकून मन सुन्न झाले असून, दस्तगीर हे उत्तम ड्रायव्हर होते.

टुरिस्ट कॅप चालकाने पादचारी तरुणाला उडवले – सविस्तर बातमी

चार चाकी गाडी चालविण्यात त्यांचा हातखंडा होता. कधीही ओव्हरटेक नाही, चुकीने गाडी चालवली नाही. वाहतुकीचे नियम कधी मोडले नाहीत. कार्यक्रमाला उशीर होतोय जरा फ़ास्ट चला म्हटले तरी ८०-१०० च्या पुढे गाडी कधीही पळवली नाही. त्यामुळे दस्तगीर भाई असतील तरच मी गाडीत झोपायचो इतकी त्यांची ड्रायव्हिंग सुरक्षित होती. ते गाडीला तर खूप जपायचे. दिवसातून दोन वेळा गाडी स्वच्छ करायचे, अशा आठवणीत मराठा सेवा संघटनेचे डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी आपल्या सारथीला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या फेसबुक पोस्टमध्ये, दस्तगीर भाई अत्यंत प्रामाणिक होते. एके दिवशी माझ्या एका मित्राचे पैसे गाडीत राहिले होते. ते भाईंनी माझ्या लक्षात आणून दिले. त्यानंतर ते पैसे मित्राला पोहोच केले. माझ्याबरोबर ते सर्वत्र फिरले परंतु, त्यांनी त्यांचा प्रामाणिकपणाचा पिंड कधीही सोडला नाही. तसेच ते प्रचंड स्वाभिमानी होते. जेवायला बोलावले तरच यायचे. त्यांना कितीही आग्रह केला तरी अतिरिक्त अपेक्षा त्यांनी कधी ठेवली नाही. त्यांची कोणाशीही सहज मैत्री व्हायची टोल नाक्यावर सर्वत्र त्यांच्या ओळखी होत्या. कोणत्याही कार्यक्रमाला गेले की हळुवारपणे तेथील सुरक्षिततेचा आढावा घ्यायचे. त्यांच्याकडे कोणत्याही स्वरूपाचा कर्मठपणा नव्हता.

अत्यंत स्वच्छ मनाचा माणूस होता. पडेल ते काम करणार. कामाची लाज कधीही बाळगली नाही. दोन वर्षापासून त्यांनी माझ्याकडील नोकरी सोडली. वय झाल्यामुळे आता जमत नाही म्हणायचे, मी त्यांना म्हटले “तुम्ही गाडीत फक्त सोबत राहावा, मी तुम्हाला शेवटपर्यंत सांभाळतो.” पण ते गावी कुटुंबात गेले. त्यांचा सतत हसरा चेहरा असायचा. ते ड्रायव्हर होते पण मी त्यांच्यावर कधी रागावलो नाही. कारण रागावायची त्यांनी कधीही वेळेच आणली नाही. इतके ते गुणी, हुशार आणि प्रेमळ होते.

गाडीची त्यांना इतंभूत माहिती होती. दस्तगीर भाई कार्यक्रमस्थळी पुस्तक विकायचे. कारभार चोख ठेवायचे. ते प्रचंड प्रामानिक होते. त्यांनी कधीही उशीर केला नाही. माझ्या अगोदर गाडी स्वच्छ करून ते तयार असायचे. गावी गेले की ते येत नसायचे. मला वाटायचे येत नसतील तर चला दुसरा ड्रायव्हर पाहू, पण तेवढ्याच क्षणापुरते! गाडी घेऊन जायचो आणि त्यांना घेऊन यायचो. इतके माझे ते जिवलग ड्रायव्हर होते. आज जिवलग ड्रायव्हर मित्र गेला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! अशा शब्दांत कोकाटे यांनी ड्रायव्हर असलेल्या मित्राला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top