Breking News
पीएमपी बसच्या धडकेत सायकलवरील एकाचा मृत्यूमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्यमेफेड्रोन विक्री प्रकरणात तिघे अटकेतपुणेकर ग्राहकांसाठी भांडारकर रस्त्यावर सुरु झाले ‘निरुपाज् येवला पैठणी अँड सिल्क सारीज’चे दालनराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ‘ग्रीन क्रुसेडर्स आणि अचिव्हर्स पुरस्कार’ वितरणबार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

कुंडमळा येथील घटना अतिशय दुर्देवी – खासदार श्रीरंग बारणे

पूल कोसळून झालेली घटना अतिशय दुर्देवी – खासदार श्रीरंग बारणे

marathinews24.com

पुणे – मावळ तालुक्यातील इंदोरी येथील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पादचारी पूल कोसळून झालेली घटना अतिशय दुर्देवी आहे. या घटनेत तीन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर, 32 हुन अधिक पर्यटक जखमी आहेत. सहा गंभीर जखमी आहेत. पाण्यात वाहून गेलेल्या पर्यटकांचे शोधकार्य सुरू आहे.

कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळला; तीन पर्यटकांचा मृत्यू – सविस्तर बातमी

हा पूल जीर्ण झाला होता. असे जीर्ण पूल तातडीने दुरुस्त करण्याची मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. खासदार बारणे म्हणाले, कुंडमळ्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करतात. रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक त्या ठिकाणी उपस्थित होते. काही जण पुलावर उभारले होते. तेव्हा हा पूल कोसळल्याने ही दुर्घटना घडली आहे.

कुंडमळा नदी ओलांडण्यासाठी, या बाजूवरून दुसर्‍या बाजूला जाण्यासाठीचा हा पूल आहे. पूल जीर्ण झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच मावळातील प्रशासनासोबत बैठक घेतली होती. पर्यटन स्थळावर अधिकचा बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना दिल्या होत्या. कुंडमळ्यातील लोखंडी पूल जीर्ण झाला होता. मावळात मोठी पर्यटन स्थळे आहेत. अनेक ठिकाणच्या पुलंची दुरवस्था झाली आहे. तातडीने ते दुरुस्त करावेत.

कुंडमळ्यातील दुर्घटनेत जखमी झालेल्याना सर्वतोपरी मदत केली जात आहे. सोमटाने येथील रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांच्या संपर्कात असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×