Breking News
पुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडले

देहूरोड पोलिसांनी काढली दोन गुन्हेगारांची धिंड

स्वत:ला ‘भाई’ म्हणवून परिसरात दहशत पसरवणाऱ्याची पोलिसांनी काढली धिंड

marathinews24.com

पिंपरी – स्वत:ला ‘भाई’ म्हणवून परिसरात दहशत पसरवणाऱ्या दोन गुन्हेगारांना देहूरोड पोलिसांनी अटक करून त्यांची धिंड काढली. मारामारी, दरोडा, चोरी आणि घातक शस्त्र बाळगण्याचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.

शॉर्ट सर्किटमुळे आग विजेचे बारा मीटर जळून खाक – सविस्तर बातमी

चंदू गोरख सकट (वय 38) आणि करण अरुण सकट (वय 23, दोघे रा. गांधीनगर, देहूरोड) अशी अटक केलेल्यांची नावे असून, त्यांच्या दोन फरार साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

अनिल चंद्रकांत काळखैर (वय ५०, रा. गांधीनगर, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी सकाळी ९ वाजता काळखैर घरी जात असताना शेजारी राहणारे सकट बंधू आणि त्यांचे साथीदार दारू पित होते. त्यांनी काळखैर यांना शिवीगाळ केली. “शिवीगाळ करू नका,” असे काळखैर यांनी सांगितल्याचा राग मनात धरून आरोपींनी त्यांच्या घरात घुसून लाकडी बॅट आणि लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. जिवे मारण्याची धमकी दिली.

तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून बॅट, लोखंडी रॉड आणि चाकू जप्त करण्यात आले. त्यांच्यावर चार गुन्हे दाखल आहेत. वडगाव न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. फरार साथीदारांचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक धैर्यशील सोळंकी करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×