Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

तरुणाच्या डोक्यात दगड मारून खून

तरुणाच्या डोक्यात दगड मारून खून

कात्रजजवळील जांभुळवाडी तलाव परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – वैमनस्यातून तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना आंबेगावमधील जांभुळवाडी तलावाच्या परिसरात घडली. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोहित नामदेव ढमाळ (रा. योगमुद्रा बिल्डींग, भूमकर वस्ती, नऱ्हे, सिंहगड रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सूरज गणेश सूर्यवंशी (रा. गणेश पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोहितचा मित्र दीपक सुखदेव बंडगर (वय २१, रा. प्रतीक हाईट्स, पारी कंपनीजवळ, नऱ्हे, सिंहगड रस्ता) याने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला कुंडमळा येथे बचाव कार्याचा आढावा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सूरज आणि रोहित हे मित्र आहेत. त्यांच्यात काही कारणावरुन वाद झाला होता शनिवारी (१४ जून).रात्री साडेदहाच्या सुमारास आंबेगाव परिसरात जांभुळवाडी तलाव परिसरात सूरज, रोहित यांच्यात पुन्हा वाद झाला. वादातून सूरजने रोहितच्या डोक्यात दगड घातला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या रोहितला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या सूर्यवंशीचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक गोरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×