Breking News
श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात १ हजार १९० लाभार्थ्यांना लाभजैव विविधतेत कीटकांचे अस्तित्व महत्वाचे-ईशान पहाडेमहंमद रफी हे महान गायक अन उत्तम व्यक्तीही-मोहन जोशीशिक्षणतपस्वी पदमभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सन्मान सोहळाकन्हेरी येथे मधुमक्षिकापालन प्रशिक्षण संपन्नगावठी पिस्तूल बाळगणारा जेरबंद; युनिट एकची कारवाईपोर्शे अपघात प्रकरणात बिल्डर विशाल अगरवालचा जामीन अर्ज फेटाळलामाजी सैनिकांना झालेल्या त्रासाबद्दल कठोर कारवाईचे आदेशतब्बल ८० लाखांच्या घोटाळा, आरोपींविरूद्ध दोषारोपपत्र दाखल“मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज” : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

कुंडमळा येथे वेगवान बचावकार्यामुळे ५१ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश

कुंडमळा येथे वेगवान बचावकार्यामुळे ५१ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, स्थानिक पोलीस, शिवदुर्ग संस्था, आपदा संस्था तसेच स्थानिक नागरिकांचीही मदत 

marathinews24.com

पुणे – मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी (दि. १५ जून) जुना लोखंडी पूल तुटून घडलेल्या दुर्घटनेत ४ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तथापि, घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, स्थानिक पोलीस, शिवदुर्ग संस्था, आपदा संस्था तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने गतीने बचावकार्य केल्यामुळे ५१ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळाले.

९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले – सविस्तर बातमी 

घटनेची माहिती मिळताच बचावकार्यासाठी या ठिकाणी २५ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. स्थानिक लोकप्रतिनिधींनीदेखील जागेवर पोहोचून काही हायड्रा मशीन जागेवर मागवल्या. सर्व पथकांनी ने एकत्रित येऊन काम चालू केले. स्थानिक नागरीकांनीही जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. या ठिकाणी किमान २५० स्वयंसेवक काम करत होते.

कुंडमळा येथे वेगवान बचावकार्यामुळे ५१ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश

प्रथम जे लोक जिवंत आहेत त्यांना वाचवण्यासाठी प्राधान्य देण्यात आले. तळेगाव येतील ग्रामीण रुग्णालय, अथर्व हॉस्पिटल, पवना हॉस्पिटल, युनीक हॉस्पिटल, बडे हॉस्पिटल येथे जखमींना दाखल करण्यात आले आहे. आज अखेर 35 जखमी रुग्णांवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले असून, 11 जखमी रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे प्रशासनातर्फे कळविले आहे.

अतिदक्षता उपचारांची गरज असलेल्या जखमींना तत्काळ आयसीयू मध्ये हलविण्यात आले. आयसीयू मधील रुग्णांची काल रात्री आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी रुग्णालयात जावून विचारपूस केली व डॉक्टरांना योग्य ते उपचार करण्यासाठी सूचना दिल्या. कुंडमळा येथील घटनास्थळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार सुनिल शेळके यांनी भेट देऊन माहिती घेतली व सर्व यंत्रणंना तात्काळ मदतीच्या सूचना दिल्या.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी चिंचवड शहरचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी घटनास्थळी उपस्थित होते.

कालपासून आपत्ती निवारण कक्ष तहसील कार्यालयात कार्यान्वित करण्यात आला आहे. कोणत्याही पर्यटकाची हरवल्याबाबत तक्रार आज सांयकाळ पर्यंत प्राप्त झालेली नाही. त्यामुळे शेवटी आज सायंकाळी 6 वाजता बचावकार्य थांबविले असल्याची माहिती मावळचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली आहे.आजच्या शोध मोहिमेत वन्यजीव संस्था, आपदा मित्र, रोहा व महाड येथील आपत्ती व्यवस्थापन संस्था यांनी देखील भाग घेतला. यावेळी पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, बापू बांगर, तहसीलदार विक्रम देशमुख, नायब तहसीलदार गणेश तळेकर, अविनाश पिसाळ, पोलीस निरीक्षक रणजित जाधव आदी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top