Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

आयपीओ गुंतवणूकीच्या नावाखाली ४० लाखांची फसवणूक

जेष्ठ महिलेला सायबर चोरट्यांचा तडाखा

marathinews24.com

पुणे – आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी जेष्ठ महिलेला तब्बल ४० लाख २० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १६ फेबु्रवारी ते २१ मे २०२५ कालावधीत कोंढवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी ६४ वर्षीय महिलेने फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी मोबाइलधारकासह विविध बँक खातेधारकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोथरूडमध्ये तडीपार गुंडाला पकडले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोंढवा परिसरात राहायला असून, १६ फेबु्रवारीला सायबार चोरट्यांनी त्यांना फोन करून आयपीओमध्ये गुंतवणूकीची माहिती दिली. आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्यांनी त्यांना सुरवातीला काही प्रमाणात नफा दिला. त्यामुळे महिलेचा विश्वास संपादित झाल्यानंतर त्यांनी गुंतवणूकीला प्रारंभ केला.

अवघ्या तीन महिन्यात तब्बल ४० लाखांवर अधिकची रक्कम त्यांनी गुंतविली होती. मात्र, परतावा न मिळाल्यामुळे त्यांनी संबंधिताकडे विचारपूस केली. त्यावेळी त्यांच्याशी सायबर चोरट्यांनी संपर्क बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुरज बेद्रे तपास करीत आहेत.

शेअर ट्रेडींगचे आमिष पडले १८ लाखांना

शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्यांनी तरूणाला तब्बल १८ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २८ डिसेंबर २०२४ ते १६ जानेवारी २०२५ कालावधीत कोथरूडमध्ये घडली आहे. याप्रकरणी विनीत पांचाळ वय ३९ रा. कोथरूड यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांनी विनीतला टेलीग्राम गु्रपमध्ये अ‍ॅड करून टास्कच्या माध्यमातून विविध बँकखात्यावर रक्कम वर्ग करण्यास भाग पाडले.

अवघ्या १९ दिवसांत १८ लाखांची रक्कम वर्ग करूनही त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विक्रमिंसग कदम तपास करीत आहे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×