Breking News
मनसेच्या आंदोलनानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यानी कंत्राटदाराला झापलेदुचाकीवर गांजाविक्रीचा प्रयत्ननागरिककेंद्रित विकासातून शाश्वत विकासाला गती द्या – मुख्य सचिव राजेश अग्रवालपुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्धगणेशोत्सवासाठी पुणे जिल्ह्यात २७ विशेष कार्यकारी दंडाधिकारी नियुक्तगुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची १५ लाखांची फसवणूकज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून एक लाखांचे दागिने चोरीलाजिल्हाधिकारी कार्यालयात समाज कल्याण विभागाच्या विविध कामकाज आढावा बैठका संपन्नडीजे, लेझरमुक्त गणेशोत्सवाचा आदर्श ‘पुणे पॅटर्न’ निर्माण व्हावाशिक्षणाच्या बळावर भटके-विमुक्त समाजाने प्रगतीची नवी ओळख निर्माण करावी

साडी वाटपाच्या नावाखाली ८२ हजारांचा ऐवज चोरला

दागिने पिशवीत काढून ठेवण्यास भाग पाडले

marathinews24.com

पुणे – मोफत साडी वाटप सुरू असल्याची बतावणी करीत चोरट्यांनी एका महिलेला त्यांचे दागिने पिशवीत काढून ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांच्यासोबत गप्पा मारण्याच्या नादात हातचलाखीने चोरट्यांनी ३२ हजारांची रोकड, मोबाइल, सोन्याचे दागिने असा ८२ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.
ही घटना २० जूनला दुपारी दीडच्या सुमारास बोपोडी चौक ते खडकी रेल्वे स्थानक परिसरात घडली आहे. याप्रकरणी ५९ वर्षीय महिलेनेही खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला खडकी परिसरात राहायला असून, २० जूनला दुपारी सव्वा एकच्या सुमारास बोपोडी चौकातून पायी जात होत्या. त्यावेळी दोघा जणांनी महिलेला गाठून चौकात मोफत साडी वाटप कार्यक्रम सुरू असल्याची बतावणी केली. तुम्ही श्रीमंत दिसत असल्यामुळे तुमचे दागिने पिशवीत काढून ठेवा.
असे सांगत चोरट्यांनी महिलेला रोकडसह मोबाइल, दागिने पिशवीत काढून ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर   महिलेसोबत काही अंतर पायी चालत असताना चोरट्यांनी  हातचलाखीने पिशवीत दागिने काढून घेतले. काही अंतरावर गेल्यानंतर महिलेने पिशवी उघडून पाहिली असता, त्यामध्ये काहीही आढळून आले नाही. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक चौगले तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×